अमृत पेय

अमृत पेय

Submitted by Asu on 15 December, 2019 - 00:13

आज जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने माझ्या या 'अमृत पेया' चा पुन्हा पुन्हा आस्वाद घ्यावा.

*अमृत पेय*

प्रभाते मुखप्रक्षालन करता
परिमळ दरवळे कसा पहा
कप-बशीचा संवाद ऐकता
मुख वदते, वा! अहा! अहा!

सुप्रभाती अंकी पेपर येता
सोफ्यासम सिंहासन महा
कषाय चषक हाती धरता
मुख वदते, वा! अहा! अहा!

स्वर्गसुखाची प्रचिती येता
जगी आनंदी नित्य रहा
गर्म कपाचा स्पर्श होता
मुख वदते, वा! अहा! अहा!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अमृत पेय