अमृत पेय

Submitted by Asu on 15 December, 2019 - 00:13

आज जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने माझ्या या 'अमृत पेया' चा पुन्हा पुन्हा आस्वाद घ्यावा.

*अमृत पेय*

प्रभाते मुखप्रक्षालन करता
परिमळ दरवळे कसा पहा
कप-बशीचा संवाद ऐकता
मुख वदते, वा! अहा! अहा!

सुप्रभाती अंकी पेपर येता
सोफ्यासम सिंहासन महा
कषाय चषक हाती धरता
मुख वदते, वा! अहा! अहा!

स्वर्गसुखाची प्रचिती येता
जगी आनंदी नित्य रहा
गर्म कपाचा स्पर्श होता
मुख वदते, वा! अहा! अहा!

कलियुगाचे अमृत म्हणती
रोज आम्हां हवा चहा
चव अलगद येता रसनी
मुख वदते, वा! अहा! अहा!

रात्रंदिनी कंटाळा येता
वाटेल तेव्हा प्यावा चहा
पाहुणे येऊनि, चहा पिता
मुख वदते, वा! अहा! अहा!

प्रगती होते चहा विकूनही
माणूसही होतो महा
उन्नती पाहून देशाची
मुख वदते, वा! अहा! अहा!

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults