अजितदादा
Submitted by Asu on 2 December, 2019 - 07:59
अजितदादा
रुसले फुगले तरी परतले
घरची त्यांना भलतीच ओढ
जिंकू न शकले तयास कुणी
अजितदादास नाही तोड
हृदयाचा ठोका चुकला
अंधारात वाट हरवता
अमोल परंतु तुम्ही ठरला
दिवसाढवळ्या घरला येता
आनंदी आनंद जाहला
मनात उरली खंत जरी
सदानकदा रुसण्याची
दादा नव्हे ही सवय बरी
कधी अचानक येई लांडगा
मेंढर कळपी खरोखरी
बाबा काका कुणी न येतील
गंमत म्हणून बसतील घरी
शब्दखुणा: