अजितदादा

Submitted by Asu on 2 December, 2019 - 07:59

अजितदादा

रुसले फुगले तरी परतले
घरची त्यांना भलतीच ओढ
जिंकू न शकले तयास कुणी
अजितदादास नाही तोड

हृदयाचा ठोका चुकला
अंधारात वाट हरवता
अमोल परंतु तुम्ही ठरला
दिवसाढवळ्या घरला येता

आनंदी आनंद जाहला
मनात उरली खंत जरी
सदानकदा रुसण्याची
दादा नव्हे ही सवय बरी

कधी अचानक येई लांडगा
मेंढर कळपी खरोखरी
बाबा काका कुणी न येतील
गंमत म्हणून बसतील घरी

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.2.12.2019)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जिंकू न शकले तयास कुणी>>>>> हे काय ? चाणक्यांना सोडुन चक्क चंद्रगुप्तावर कविता? पण बरी आहे. जिंकले की तयांना राऊतांनी.

रुसले फुगले तरी हरखले
सत्तेची त्यांना भलतीच ओढ
चाणक्यांच्या संदेशाला कुठेच नाही तोड

हृदयाचा ठोका चुकला जेव्हा
पडला भवती कमळाचा दोर,
धुम ठोकली काकांकडे
तेव्हा जाणवले मै हू किस ओर

क्षणात फितुर, क्षणात आतुर
ही कसली हाव !
घनचक्कर झालो पुरता
जेव्हा काकांनी खेळला डाव