सांजवेळी केसरी तळी,
तुझी आठवण येते आहे,
सौभाग्याची अभागी ही,
अमावास्येत जगत आहे,
पावसाची सर,
प्रेमाचे गाणे गाते आहे,
गाणे प्रेमाचे कि विरहाचे,
हे मात्र गूढच आहे,
प्रेम असो वा विरह,
आहे ते आपले आहे,
म्हणूनच, प्रेम आपले जिंकणार,
हे आता उमजते आहे,
काळोख्या रात्री नंतरची रम्य,
पहाट आता झाली आहे,
या विचारातच,
आता मी निद्राधीन होत आहे.....
@किर्ती कुलकर्णी
तीचा तो राग पाहून सार्थक अवाक झाला.... व श्रेया च्या पाठीपाठी गेला.... श्रेया त्याच जिन्यावर जाऊन बसली जिथे अगोदर सार्थक बसला होता.... श्रेया बाहेरूंन कितीही strong असल्याचं भासवत असली तरीही ती खूपच हळवी होती... तिचा राग अजूनही कमी झाला नव्हता....
"मला आता कळालं कि वेदांत असं का म्हणाला होता कि , हिच्यापासून जपून रहा...खूप danger आहेस तू. ..", सार्थक खाली मान घालत बोलला...
"गप्प रे सार्थ्या....", असं म्हणून ती थोडीशी हसली... सार्थक ने नीट पाहिल्यावर त्याला कळालं कि ती रडत होती...
त्यानंतर देखील पूर्ण ग्रुप च चिडवणं चालूच होत ... सार्थक आणि स्वाती दिसतील तिथं सगळी त्यांना चिडवायची...बघता बघता हि गोष्ट पूर्ण कॉलेजमध्ये झाली ... सगळ्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी आहे असं वाटू लागलं.... पण श्रेया व तिचा ग्रुप फक्त गंमत म्हणून त्यांना चिडवायचा... त्यांना ह्या गोष्टीची कल्पनादेखील नव्हती...
"अगं श्रेया... सार्थक आणि स्वाती मध्ये खरच काही आहे का ग ?", श्रेयाच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं.
"कश्याबद्दल ग ??", श्रेयाने माहित नसल्यासारखे करून तीला विचारले....
"गप हा श्रेया ... तू त्या दोघांचीही मैत्रीण आहेस.. उगाच नाटक नको करू ", तिची मैत्रीण बोलली...
आज तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. का कुणा जाणे, छातीचे ठोके खूप वाढले होते. मन रमवावे म्हणून ती लॅपटॉप उघडून काहीतरी search करत होती. इतक्यात तिला कॉलेज फोटोज असा फोल्डर दिसला. अन उघडून ती काही फोटोज पाहू लागली. आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागला.. आणि आठवला तो.......