प्रेम कि मैत्री? भाग ३

Submitted by मनवेधी on 19 September, 2019 - 13:32

त्यानंतर देखील पूर्ण ग्रुप च चिडवणं चालूच होत ... सार्थक आणि स्वाती दिसतील तिथं सगळी त्यांना चिडवायची...बघता बघता हि गोष्ट पूर्ण कॉलेजमध्ये झाली ... सगळ्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी आहे असं वाटू लागलं.... पण श्रेया व तिचा ग्रुप फक्त गंमत म्हणून त्यांना चिडवायचा... त्यांना ह्या गोष्टीची कल्पनादेखील नव्हती...

"अगं श्रेया... सार्थक आणि स्वाती मध्ये खरच काही आहे का ग ?", श्रेयाच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं.

"कश्याबद्दल ग ??", श्रेयाने माहित नसल्यासारखे करून तीला विचारले....

"गप हा श्रेया ... तू त्या दोघांचीही मैत्रीण आहेस.. उगाच नाटक नको करू ", तिची मैत्रीण बोलली...

श्रेया तशी खूप सुज्ञ होती... तिला सार्थकला किंवा स्वातीला कोणत्याही त्रासांमध्ये बघायचं नव्हतं... आणि त्या दोघांनीही त्यांच्या खऱ्या काय फीलिंग्स आहेत हे श्रेया ला सांगितलं नव्हतं... म्हणून ती थोड्या रागातच तिच्या मैत्रिणीला म्हणाली

"हे बघ... हा त्या दोघांचा पर्सनल मॅटर आहे... तूला किंवा मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा काहीही हक्क नाहीये.... सो तू तुझ्या स्टडी वर लक्ष दे ...", हे बोलून ती तिथून निघून गेली....

श्रेया ला स्वाती आणि सार्थक बद्दल खूप काळजी वाटू लागली.... म्हणून ती सरळ सार्थककडे गेली व घडलेला सगळा प्रकार सांगितला.... सार्थकने हे सगळं खूप casually घेतलं होत. पण आता त्यालादेखील काळजी वाटू लागली होती...

"श्रेया... अगं आमच्यात अजून ह्याबद्दल काहीच बोलणं झालं नाही .... आणि मला त्याबद्दल काहीच फीलिंग्स हि वाटत नाहीत.... पण ती बोलताना खूप flirt करते... त्यामुळे मला काहीच कळत नाही ", सार्थकच हे बोलणं ऐकून श्रेया ला हसूच आलं...

"किती भोळा आहे ना हा... मंद ....", श्रेया मनातून च बोलली...

"सार्थ्या .... विषय वाढायच्या अगोदर काहीतरी कर .... नंतर म्हणू नको कि मला कोण बोललं नाही.... आणि विचार करून निर्णय घे ... ", असं बोलून त्याच्या डोक्यात टपली मारून ती निघून गेली...

घरी गेल्यावर सार्थक पूर्ण वेळ ह्याचाच विचार करत होता.... नेहमीप्रमाणे स्वाती चा message आला.... सार्थक ने विचार केला तिला विचारुण तरी बघूया.... atleast तिच्या मनात अपल्या बद्दल काय आहे हे तरी कळेल....

"स्वाती तुला माहिती आहे का ग.. कॉलेज मध्ये सगळ्यांना असं वाटत आहे कि तुझं आणि माझं काहीतरी सुरु आहे....", सार्थक ने message केला...

"हो .... लोकांना काही काम नाहीत ना रे ... आपण लक्ष नाही द्यायचं.." स्वाती न रिप्लाय केला...

सार्थक ला थोडं ह्याच आश्चर्यच वाटलं.... तरीही धाडस करून त्याने message केला

"तरीही तुझ्या मनात माझ्याबद्दल काही आहे का ग? "

"मूर्ख आहेस काय रे तू ?? तुझं तोंड बघ आरश्यामध्ये " स्वाती चा हा रिप्लाय बघून सार्थक ला खूप वाईट वाटले... जी मुलगी रोज आपल्यासोबत flirt करते तिच्या असा रिप्लाय बघून त्याच थोडं मन दुखावलं गेलं... व पुढे काहीच न बोलता तो झोपी गेला....

दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये आल्यावर सगळे सार्थक कडे बघून हसत होते.... स्वाती ने झालेला प्रकार सगळ्यांना संगीतला होता....सार्थक ला खूप च अपमानित झाल्या सारखं वाटलं.... श्रेया ला देखील हा प्रकार कळला... तिने सार्थक चा कॅम्पस मध्ये शोध घेतला...कारण सार्थकला सांभाळणं तिला जास्त महत्वाच वाटलं.... सार्थक कॅन्टीनच्या पाठीमागच्या जिन्याजवळ बसला होता.... श्रेया ला सार्थक ला तश्या अवस्थेत बघून खूपच वाईट वाटलं....

"सार्थ्या.... मंदा इथं काय बसलायस.... चल lecture नाहीत करायचे काय? ", श्रेया काहीच न झाल्यासारख त्याला बोलली... तिला पाहून सार्थकला रडू च कोसळले... व झालेलं सगळं तिला सांगून टाकलं.... श्रेयाला अगोदर च स्वातीचा खूप राग आला होता...

"चल... रडतोयस काय मुर्खा ...", असं म्हणत श्रेया त्याच्या हाताला धरून स्वाती कडे गेली. ...स्वाती तिच्या मैत्रिणींच्या समोर timepass करत बसली होती.....

"स्वाती हा काय प्रकार आहे .... तू असं कसं वागू शकतेस यार ", श्रेया ओरडत च स्वातीला बोलली...

"अगं हा बघ ना.... ह्याची लायकी तर आहे की माझ्या समोर उभं रहायची... आणि मला विचारतोय माझ्याबद्दल आहे का काही मनात... ह्यांच्याबद्दल. ...", असं म्हणत स्वाती हसायला लागली....

"स्वाती बस कर.... त्याच्याशी फ्लर्ट करताना तुला हे जाणवलं नाही का?? आणि तो काही तुला propose करत नव्हता... त्याने फक्त विचारलं... त्यात सगळ्या गावभर करायची काहीच गरज नव्हती. .. तू त्याला सांगून गप्प राहू शकली असतीस..." श्रेयाचा चेहरा रागाने लालबूंद झाला होता...

" ए...तू काय सांगतेस ग.... आणि flirt तर मी सगळ्यांशीच करते... ह्यात काय चुकलं माझं... त्याला कळायला नको का...", स्वाती तोऱ्यात बोलली...ती जशी बोलत होती ते पाहून श्रेया चा राग वाढत च होता... आणि रागारागात तिचा हात स्वातीच्या गालावर पडला...

"इथूनपुढे सार्थक च्या आसपास जरी दिसलीस तरी बघ ", असं बोलून श्रेया तिथून निघून गेली...

.

.

क्रमश :

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users