जन्म तुझा फसलेला
Submitted by Asu on 26 August, 2019 - 12:51
जन्म तुझा फसलेला
माणसा असा तू त्रासलेला
जन्म तुझा फसलेला ||ध्रु||
जगी नाही माणूस कोणी
दुःख वेदना नसलेला
स्वप्न विरती वाऱ्यावरती
जो तो जगी हरलेला ||१||
बढाया फुशारकी नका मारू
वल्गनांत वृथा रमलेला
निद्रिस्त निश्चिंत आज रात्री
खात्री उद्याची नसलेला ||२||
मानमरातब कौतुक सगळे
संगती येत नसलेला
जन्म माणसाचा का भोगला
सरणावरही न समजलेला ||३||
शब्दखुणा: