Submitted by Asu on 26 August, 2019 - 12:51
जन्म तुझा फसलेला
माणसा असा तू त्रासलेला
जन्म तुझा फसलेला ||ध्रु||
जगी नाही माणूस कोणी
दुःख वेदना नसलेला
स्वप्न विरती वाऱ्यावरती
जो तो जगी हरलेला ||१||
बढाया फुशारकी नका मारू
वल्गनांत वृथा रमलेला
निद्रिस्त निश्चिंत आज रात्री
खात्री उद्याची नसलेला ||२||
मानमरातब कौतुक सगळे
संगती येत नसलेला
जन्म माणसाचा का भोगला
सरणावरही न समजलेला ||३||
विश्वाच्या व्यापात किडा तू
कोण तू? गर्वाने फुगलेला
फुटेल कधी फुगा जगण्याचा
माहीत काहीच नसलेला ||४||
अज्ञानातच सुख असते
भोगून घे जगण्याला
सुख असते दुःख साहण्या
जाणून जगण्यावर रुसलेला ||५||
प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खरे आहे.
खरे आहे.
अप्रतिम
अप्रतिम
खुपच छान.
खुपच छान.
"खात्री उद्याची नसलेला"
"खात्री उद्याची नसलेला"
अगदी खरय
अप्रतिम कविता
सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद!