पाऊस पहिला वहिला

पाऊस पहिला वहिला

Submitted by Asu on 10 June, 2019 - 11:54

पाऊस पहिला वहिला

पाऊस पहिला वहिला
मृदगंध उधळीत आला
तापल्या आर्त मनाला
आश्वासन देऊन गेला

सरीवर सरी कोसळता
मन ओले ओले झाले
आठवणींच्या बीजांना
क्षणात अंकुर फुटले

गोंजारता तृण बाळांना
पान्ह्याचे गहिवर फुटले
संजीवनी त्या मिळता
मन हिरवे हिरवे झाले

शिवार माझे फुलले
पीक आठवणींचे आले
कोठार शिगोशिग भरता
मन तृप्त तृप्त झाले

Subscribe to RSS - पाऊस पहिला वहिला