माड

माड

Submitted by दत्तात्रय साळुंके on 4 June, 2019 - 01:35

माड
एक माड एकदा
ऊंच ऊंच वाढला
बघता बघता कसा
आभाळी चढला

विचारले मी त्याला
कुठे लगबग निघाला
झावळ्या हलवून म्हणला
जातो देवाच्या भेटीला

टाचा उंचावून राहिला
घर देवाचे शोधत
बोट सुर्यकिरणांचे धरले
आभाळही मागे पडले

प्रयत्नात झावळ करपून
गेले
अंगावर खडबडीत खवले
आले

तरीपण माड खचला
नाही
धुमारा आशेचा सुकला
नाही
इतक्यात झाली आकाशवाणी
शहाळ्यात तुझ्या अमृतपाणी
तहाणलेल्या देऊन बघ
प्रभूकृपेचा बरसेल मेघ

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माड