माड

Submitted by दत्तात्रय साळुंके on 4 June, 2019 - 01:35

माड
एक माड एकदा
ऊंच ऊंच वाढला
बघता बघता कसा
आभाळी चढला

विचारले मी त्याला
कुठे लगबग निघाला
झावळ्या हलवून म्हणला
जातो देवाच्या भेटीला

टाचा उंचावून राहिला
घर देवाचे शोधत
बोट सुर्यकिरणांचे धरले
आभाळही मागे पडले

प्रयत्नात झावळ करपून
गेले
अंगावर खडबडीत खवले
आले

तरीपण माड खचला
नाही
धुमारा आशेचा सुकला
नाही
इतक्यात झाली आकाशवाणी
शहाळ्यात तुझ्या अमृतपाणी
तहाणलेल्या देऊन बघ
प्रभूकृपेचा बरसेल मेघ

थकून वाटसरू टेकला बुंध्यात
शहाळे पडले धपकन पुढयात
वाटसरूने गोड पाणी प्यायले
खाता मलाई चैतन्य आले

माडाकडे उंचावून हात
म्हणाला वाटसरू धन्यवाद
बरसली धार ढगातून तेव्हा
माडाला मिळाला करुणाप्रसाद

तेव्हापासून माड वाढत नाही
फक्त समाधाने फळत राही

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users