ठेच

ठेचेचा दगड

Submitted by पाषाणभेद on 19 March, 2022 - 00:33

दगडाची ठेच लागता
रक्त येई पायात
कशास होता पडला
दगड असा रस्त्यात

कितीतरी असे अडले असती
ठेच लागून पडले असती
परी न कुणी विचार करती
फेकून द्यावा तो दगड कुठती

असाच आला वेडा कुणी
खाली वाकला तो झणी
उचलूनी दगड तो पायी
लांबवर कुठे फेकूनी देयी

- पाषाणभेद
१९/०३/२०२२

शब्दखुणा: 

ठेच

Submitted by Asu on 3 June, 2019 - 22:17

ठेच

ठेच लागते जरी पुढच्याला
मागचा तरी व्हावा शहाणा
शिकण्याची पण करी उपेक्षा
माणसा तू तर अति दिवाणा

डोळे असुनि जगी आंधळा
मार्ग आक्रमिता असे वेंधळा
ठेच लागता कोसे नशिबाला
दोष बिचाऱ्या त्या दगडाला

चूक कुणाची दोष कुणाला
जगण्याचा ना मार्ग चांगला
चुकता चुकता तो शिकतो
दोषी स्वतःला जो मानतो

ठेच असे गतिरोधक वेगाला
वेग वाढताच अपघात घडे
पाहुनि खाली इकडे तिकडे
जगण्याचे आपण घ्यावे धडे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ठेच