रुद्रास आवाहन

रुद्रास आवाहन

Submitted by Asu on 4 March, 2019 - 11:40

आज महाशिवरात्री निमित्त -
रुद्रास आवाहन

रुद्रा ये, डमडमरू घुमवित ये!
दुष्ट तुडविण्या तांडव करीत ये ||ध्रु||

ध्यान तुझे ना कसे भंगले
हिमशिखरे रक्तांनी रंगले
भयभीत जन शत्रू मातले
लांडग्यागत बळी घेतले
ये तव भूमी रक्षिण्या ये ||१||

थरथरू दे धरती सारी
भयकंपित होऊ दे अरि
मातले अती शेजारी
निळकंठ तू गंगाधारी
ये निःपात करण्या ये ||२||

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रुद्रास आवाहन