रुद्रास आवाहन

Submitted by Asu on 4 March, 2019 - 11:40

आज महाशिवरात्री निमित्त -
रुद्रास आवाहन

रुद्रा ये, डमडमरू घुमवित ये!
दुष्ट तुडविण्या तांडव करीत ये ||ध्रु||

ध्यान तुझे ना कसे भंगले
हिमशिखरे रक्तांनी रंगले
भयभीत जन शत्रू मातले
लांडग्यागत बळी घेतले
ये तव भूमी रक्षिण्या ये ||१||

थरथरू दे धरती सारी
भयकंपित होऊ दे अरि
मातले अती शेजारी
निळकंठ तू गंगाधारी
ये निःपात करण्या ये ||२||

तू सांब सदाशिव भोळा
उघडू नको तिसरा डोळा
नापाक नादान पाक
क्षणात होईल खाक
ये गुंड नरमुंड छेदण्या ये ||३||

नको जगाचा विध्वंस
सज्जना घेऊ दे श्वास
ना हिंदू ना मुसलमान
लेकरे आम्ही तव सान
ये भयमुक्त करण्या ये ||४||

प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि.04.03.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults