फ्रेंच फ्राईज

फ्रेंच फ्राईज - शस्त्रिबुवांचे बासरीवादन -एक

Submitted by मकरंद गोडबोले on 19 February, 2019 - 10:17

एक मोठा स्फोट झाला, आणि शास्त्रिबुवा ताड्कन उठून बसले. फ्रेंच फ्राईजमधे रहायला आल्यापासून शास्त्रिबुवांना अशीच जाग यायची. एक मोठा स्फोट व्हायचा, आणि शास्त्रिबुवा ताड्कन जागे व्हायचे. आणि मग जोरात कर्कश्श किंचाळ्या येत रहायच्या. काही सेकंदात ते बंद व्हायचे. मग शास्त्रिबुवा दात घासायला लागायचे. आणि दात घासून ते कमोडवर टेकले रे टेकले, की परत तो मोठा स्फोट व्हायचा. बसलेले बुवा घाबरून उठायचे, मग परत त्या कर्कश्श किंचाळ्या. त्या ऐकत ऐकत शास्त्रिबुवा परत टेकले, की अचानक तो आवाज बंद व्हायचा. हे असे आपल्याशी कोण का खेळतोय, हे त्यांना काही कळत नव्हते.

शब्दखुणा: 

फ्रेंच फ्राईज - जोशीकाकुंचे आॅडिट

Submitted by मकरंद गोडबोले on 18 February, 2019 - 22:01

सिल्वन टाॅवर ही काही तशी जुनी सोसाटी नव्हती. पण बिल्डरनी अगदी सगळी कागदपत्रे नीट करून दिल्यामुळे सगळी जबाबदारी अचानक सोसाटीवर आली होती. पुण्यात नाहीतर जागा सोसाटिच्या मालकिची कधी होतच नाही. पण फ्रेंच फ्राईजचे नशीब चांगले होते. मग लगेचच, सोसाटिच्या बाॅडिवर नेमणुक करण्याचे काम सुरू झाले.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फ्रेंच फ्राईज