फ्रेंच फ्राईज - शास्त्रिबुवांचे बासरीवादन २
शास्त्रिबुवांच्या हातातली बासरी, फ्रेंच फ्राईजमधे चांगलीच वाजली. जोशीकाकूंच्या आॅडिटनंतर फ्रेंच फ्राईजमधे उत्साहवर्धक काहीच घडले नव्हते. त्यामुळे ही बासरी घराघरात वाजायला लागली. तशी तिनी पहिली किंचाळी फोडल्यानंतर त्याच्यात बरीच सुधारणा होउ लागली होती. आता सहा भोकांमधली दोन तरी आवाजी होती. बाकिच्यांची अजूनही विपश्चना सुरू होती. ती बहुतेक शास्त्रिबुवांचे गुरु विपश्चनेला गेल्यामुळे असावी अशी आपली आमची अटकळ. पण त्या दोन बोलत्या भोकांनी शास्त्रिबुवांना भलतीच तरारी आलेली. नुसती बुवांनाच नाही, तर अख्ख्या फ्रेंच फ्राईजला तरतरी आलेली.