स्वप्ने

स्वप्ने

Submitted by राजेंद्र देवी on 12 August, 2018 - 23:51

स्वप्ने

लावीन म्हणतो चंद्रज्योत दारी
उजळून निघेल रात्र सारी
शांत झोप , स्वप्ने पऱ्यांची
मऊ बिछाना असेल शेवरी

असेल बगीचा गुलाबाचा परसदारी
जलराणीच्या हाती दवाची झारी
मंद झुळूक असेल वाऱ्याची
सुगंध भरून राहील दरबारी

तुझी अन माझी गोष्टंच न्यारी
गरूडाला लाजवेल स्वप्न भरारी
ऐटीत बस पुढे तू
सायकल हीच आपली "फेरारी"

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - स्वप्ने