"ती"

Submitted by अजय चव्हाण on 10 January, 2019 - 09:12

सरीत सरलेल्या,चिंब चिंब झालेल्या..
अशक्य बहरलेल्या,कधी दरवळलेल्या
फुलांच्या मळ्यांत, एकाकी तळ्यात..
निळ्या आसमंतात,थोड्या निमिषभरात..
अलगद अवतरली "ती" परीच्या वेशात..

शुभ्र वस्त्र , निळे अभ्र
बंद ओठातून निघेना "ब्र"
निळे डोळे, काजळ काळे...
गुलाबी गालांत मोहक खळे..
मोरपिशी कुंडले कानात..
चिक मोत्याची माळ गळ्यात..
अवचित नजरेचा ठाव थेट काळजात..

स्वप्ने थिजलेली,क्षणे ओथंबलेली..
कोर्या मनात स्पंदने शहारलेली..
मंद झुळकेत,रंगीत सांज ऊन्हांत....
धुंद हवेत फुलपाखरे विहरलेली..
थोडा दीर्घ श्वास,धडधड कानात..
स्पर्श एकच नि एकच प्रश्न...
काय असेल तिच्या मनात??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद चैतन्य...हल्ली बिझी असतो खुप...जमेल तसं वेळ काढून लिहतो..

मोबाईलवरच्या की बोर्डवर कोर्या असचं येतय.. तुम्ही लिहलं तसं लिहता/ टाईप करता येत नाहीये...