बोला / मनाची गाठ

बोला/मना फुलाची गाठ

Submitted by मंजूताई on 17 July, 2018 - 02:34

प्रसंग १:मागच्या वर्षी आई आजारी होती. तिची अन्नावरची वासनाच उडाली होती. काही खायचीच नाही. एक दिवस आम्ही गप्पा मारत जेवत असतांना (आम्ही जेवत व ती जुन्या आठवणीत रंगलेली) तिने 'गाठोडी' बद्दल सांगितले ज्याच्याबद्दल पूर्वी कधी बोलली नव्हती. ज्याकाळी न कळवता जायची पध्दत होती त्या काळातली ही गोष्ट !उपवासाच्या दिवशी मराठवाड्यातल्या जालनाच्या माई देशपांडेकडे गेली होती. माईंना उपास आहे कळताच त्यांनी अगत्याने थांब तुझ्यासाठी खास पदार्थ करते म्हणत गाठोडी करायला घेतली. मराठवाड्यातला हा खास रुचकर व पौष्टीक पदार्थ!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बोला / मनाची गाठ