मी घरात शिरलो........................................................

चिरुमाला (भाग ६)

Submitted by मिरिंडा on 8 June, 2018 - 06:46

मी घरात शिरलो. साडेसहा झाले होते. सूर्य मावळतीला चालला होता. जुडेकरने बॅग ठेवली आणि तो निघाला. तो परत आठ वाजेपर्यंत डबा घेऊन येणार होता. तो गेला आणि मी उघड्या दिसणाऱ्या संधिप्रकाशाकडे पाहत राहिलो. कपडे बदलून फ्रेश होऊन मी परत दिवाणावर बसलो. प्रथम मी थंडपेयाची एक बाटली उघडली. शांतपणे पेय्य रिचवीत राहिलो. मला परत एकदा संध्याकाळच प्रसंग आठवला. कोण हा शितोडीकर. माझ्या पहिलयाच दिवशी भांडण करून जाणारा. खरंतर ते एकतर्फी भांडण होतं. मी फारसा प्रतिसाद न दिल्याने ते वाढले नाही आणि म्हणूनच त्याला जास्त राग आला असावा. माझ्या डोक्यातून तो जाईना.

Subscribe to RSS - मी घरात शिरलो........................................................