मी पाटलांच्या मागे चाललो होतो. ..............

चिरुमाला (भाग २)

Submitted by मिरिंडा on 30 April, 2018 - 02:41

मी पाटलांच्या मागे चाललो होतो. मध्येच एकदा थांबून मला म्हणाले," आणा ती ब्याग इकडं.." मी म्हंटले , " राहू द्या हो. मी आणतो की." त्यावर ते म्हणाले," अवंअसं कसं ,कुनि पाह्य्लं तर काय म्हनल ,पावन्यास्नी सामान घेऊन चालवतोय. " मग मात्र मी त्यांना म्हंटलं , " नाही नाही , ठीक आहे. " पण त्यांनी ऐकलं नाही. माझ्या हातातली बॅग घेऊन ते निघाले. आम्ही बराच वेळ चालत होतो. रस्ता म्हणजे रानातली पायवाटच होती. .... आजूबाजूला माजलेलं रान आणि त्यातली रानटी रंगीबेरंगी फुलं पाहात मी जात होतो. पाटील वयस्कर असले तरी त्यांचा चालण्याचा वेग माझ्य दुप्पट होता. मला फार भराभर चालावे लागत होते.

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - मी पाटलांच्या मागे चाललो होतो. ..............