परंतु

परंतु

Submitted by जित on 23 January, 2018 - 09:03

तिला पाहता प्रीत जागली परंतु
सांगावे तिला वाटलेही परंतु
धीर येण्यास थोडा वेळ लागला परंतु
शब्द जुळवून वाक्य झालेही परंतु
जवळ जाउनी तिच्या हाक मारली परंतु
तिने वळूनी पाहिलेही परंतु
धास्तावलो ती रागावली तर परंतु
भावना बाजूला वाजले किती परंतु
हासुनी तिने वेळ सांगितली परंतु
हासण्याने निर्धार वाढला परंतु
परत भावनांना उभारी परंतु
बस तिला घेऊनी गेलीही परंतु
शब्द राहिले मनातच परंतु
हा प्रांत आपला नाही परंतु
परतुनी दिसता ती परंतु
मनामध्ये पुन्हा कालचाच परंतु

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - परंतु