जाच नुसता त्रास नुसता

Submitted by साती on 12 August, 2011 - 02:49

कानफटभर नाद घुमला खास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता

कार्ड पैसे चेक ठेवा पर्समध्ये
सोबतीला बैल न्या बोजास नुसता

गळसरी त्यांची सुवर्णी माखलेली
एकटा काळा मणी नावास नुसता

का असे डोळे वटारून पाहते ती
"हाड" वदलो सासरी श्वानास नुसता

भांडता ती झोपण्याचे सोंग घे तू
चादरीखालून गुपचुप हास नुसता

काय खाऊ कागदाचे चंद्र तारे
सोड कविता जात जा कामास नुसता

आठ दिस गेले वरी काही कळेना
हात त्याचा लागला हातास नुसता

छापल्या 'नुसत्याच' या इतक्या जणांनी
वाचण्याचा जाच नुसता त्रास नुसता

जाणते मी ही गझल नाही खरे तर
वाच साती शायरीचा भास नुसता

शब्दखुणा: 

सही

मस्त

मस्स्स्त आहे ...... Proud

"काय खाऊ कागदाचे चंद्र तारे
सोड कविता जात जा कामास नुसता"
...... बिच्चारा कवि नवरा

काहीच्या काही कविता असावी तर अशी. Happy

तंत्रात बसवली तर उत्तम हजल होऊ शकेल,
श्री बेफिकिर यांची मदत घ्या हवी तर.