हाक

Submitted by मी अभिजीत on 29 April, 2008 - 23:26

देऊ नकोस हाक , झाला आता उशीर
आधी कधीच नव्हती माझी तुला फ़िकीर…

उध्वस्त गाव झाला , ज्वाळा तुझ्याच होत्या
आक्रोश ऐकताना होतीस तू बधीर…

आता कशास आला दाटून हा उमाळा
खोटेच सर्व आहे डोळ्यातलेही नीर…

होतो पियुष जेव्हा , ओठी न लावीले तू
आता विषास प्याया झालीस तू अधीर…

आहे निघून गेला आत्मा कधीच माझा ,
आत चितेत फ़क्त जाळायचे शरीर…

– अभिजीत दाते

गुलमोहर: 

होतो पियुष जेव्हा , ओठी न लावीले तू
आता विषास प्याया झालीस तू अधीर…
झकास..

पण ही गझल वाटते... गागालगा लगागा*२