मोठ्यांसाठी बालकविता

दिवास्वप्न

Submitted by अनन्त्_यात्री on 17 September, 2017 - 23:38

वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी
धग सूर्याची परिटघडीस्तव येईल माझ्या कामी

कधि चंद्राचा घेउनी चेंडू करेन क्रीडा गगनी
चांदणमेवा थोडा थोडा चाखिन अधुनी मधुनी

प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे
अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे?

दिवास्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात?
ठाऊक नाही, पण तोवर मी झोपून पाहीन वाट
Happy

Subscribe to RSS - मोठ्यांसाठी बालकविता