दिवास्वप्न

Submitted by अनन्त्_यात्री on 17 September, 2017 - 23:38

वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी
धग सूर्याची परिटघडीस्तव येईल माझ्या कामी

कधि चंद्राचा घेउनी चेंडू करेन क्रीडा गगनी
चांदणमेवा थोडा थोडा चाखिन अधुनी मधुनी

प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे
अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे?

दिवास्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात?
ठाऊक नाही, पण तोवर मी झोपून पाहीन वाट
Happy

Group content visibility: 
Use group defaults

नेहमीप्रमाणे सुंदर, अप्रतिम लिहीलंय.
संपुर्ण कविता वाचल्यानंतर, तिचा आशय लक्षात घेतल्यावर; शेवटच्या दोन ओळींत मला गुढार्थ भरलेला दिसतो आहे! आपल्यालाही काही गुढार्थ अभिप्रेत आहे का? Happy

राहुल, शेवटच्या दोन ओळींत ...नो गूढार्थ.
फक्त गंमत...भव्य स्वप्न पडायला तितकीच गाढ झोप हवी ना? Happy

क्या बात है !!
जे न देखे रवी......सुपरमॅन कवी Happy

राहुल, शेवटच्या दोन ओळींत.. >>>
अनंतजी, हरकत नाही. मी झोपेचा अर्थ 'योगनिद्रे' शी लावला आणि म्हणून संपूर्ण कवितेतलं वर्णन नकळत मला मनानं सिद्धांच्या जगतात घेऊन गेलं! जिथे काहीच अशक्य नसतं.... Happy
आपल्या पुढील कवितेच्या प्रतिक्षेत. Happy

Rahul, Thanks for your second comment which provided me with a different viewpoint!

mr.pandit , आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !