श्वापद

कदाचित... ( भयगुढ कविता ) सुधारीत आवृत्ती

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 20 February, 2017 - 03:25

कदाचित ही फक्त हवा असेल
जी चाल करून येतीये
विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना
खिडक्यांवर फटकारतीये

कदाचित हा फक्त पाऊस असेल
जो आज काळाकुट्ट वाटतोय
दाराछतातून मुजोरीने घुसून
सर्वाँगाला डसतोय

कदाचित ह्या फक्त सावल्या असतील
ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत
सराईत मारेकऱ्यासारख्या
मला चारीबाजूंनी घेरताहेत

कदाचित हा फक्त कावळा असेल
जो आत्ताच खिडकीवर धडकलाय
रक्ताळलेली चोच आदळून
काचांना तडे देत सुटलाय

Subscribe to RSS - श्वापद