कदाचित... ( भयगुढ कविता ) सुधारीत आवृत्ती

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 20 February, 2017 - 03:25

कदाचित ही फक्त हवा असेल
जी चाल करून येतीये
विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना
खिडक्यांवर फटकारतीये

कदाचित हा फक्त पाऊस असेल
जो आज काळाकुट्ट वाटतोय
दाराछतातून मुजोरीने घुसून
सर्वाँगाला डसतोय

कदाचित ह्या फक्त सावल्या असतील
ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत
सराईत मारेकऱ्यासारख्या
मला चारीबाजूंनी घेरताहेत

कदाचित हा फक्त कावळा असेल
जो आत्ताच खिडकीवर धडकलाय
रक्ताळलेली चोच आदळून
काचांना तडे देत सुटलाय

कदाचित हा फक्त भास असेल
रुममेट जोरात किंचाळल्याचा
आपोआप दिवे विझल्याचा अन
मानेमागच्या उष्णगार श्वासांचा

कदाचित भासच असेल हा

कदाचित स्वप्न असेल

कदाचित

ती आली असेल
-----------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Thanx

कवीतेमध्ये संपादन करून सुधारणा केली आहे.

आधीची कविता :
----------
कदाचित ही फक्त हवा असेल
जी चाल करून येतीये
विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना
खिडक्यांवर फटकारतीये

कदाचित हा फक्त पाऊस असेल
जो ढगांना प्रसवतोय
दाराछतातून टपटपून
अंगावर बर्फशहारे आणतोय

कदाचित ह्या फक्त सावल्या असतील
ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत
सराईत शिकाऱ्यासारख्या
मला चारीबाजूंनी घेरताहेत

कदाचित हा फक्त कावळा असेल
जो आत्ताच खिडकीवर धडकलाय
रक्ताळलेली चोच आदळून
काचांना तडे देत सुटलाय

कदाचित हा फक्त भास असेल
कुणीतरी जोरात किंचाळल्याचा
आपोआप दिवे मालवल्याचा अन
मानेवरच्या उष्ण श्वासांचा

कदाचित हा भासच असेल

कदाचित स्वप्न असेल

कदाचित

ती आली असेल
-----------------------------------------------

जमलीये.
ते रुममेट, ती आली असेल वैगेरे वाचुन
VICIOUS - Award Winning Short Horror Film आठवलं.