महाराजांच्या खास दासींमधे नेमणूक झाल्याने ................

श्री संतराम (भाग सातवा )

Submitted by मिरिंडा on 2 November, 2016 - 08:02

महाराजांच्या खास दासींमध्ये नेमणूक झाल्याने स्वेच्छेला , आपल्याला काहीतरी करायला मिळणार याची खात्री झाली. स्वकक्षात आल्याबरोबर तिने प्रथम हाताची जखम पाहिली. तिथे आता रक्त थांबून सूज आली होती. तो भाग आता कमालीचा दुखत होता. तिला आश्चर्य वाटले की माणूस स्वतःच्या सुरक्षिततेबाबत अस्वस्थ असला की शारीरिक जखमांची सुद्धा जाणीव थांबते. पण जरा जरी स्वस्थता मिळाली की ती लागेचच होऊ लागते. आता मात्र तिला वेदनांनी चांगलेच पछाडले होते. तिला हळूहळू ज्वरासारखी भावना होऊ लागली होती. पण तिला हे सगळे सांगता येण्यासारखे नव्हते. आणि पिंगलाक्षाला सांगायला तिला दासीचा आधार नको होता.

Subscribe to RSS - महाराजांच्या खास दासींमधे नेमणूक झाल्याने ................