स्वप्नातलं भविष्य (भाग ३रा )
Submitted by मिरिंडा on 6 October, 2016 - 23:17
वाड्यात काय झालं असेल ? काल बांधलेला सदा सुटून खाली आला कसा ? शीः ... तिने मग देवीचे दर्शन घेतले. आणि ती जत्रेत नैनाला घेऊन मिसळून गेली. थोडं फार खाणं झालं होतं. अडीच तीनच्या सुमारास ती वाड्याच्या गेटजवळ परत आली. आतून मामांच्या बोलण्याचा आवाज येत होता. ते कोणाशी तरी बोलत होते. तिला वाटलं खडपा. नैनाच्या हातात दोन तीन जत्रेतल्या शिट्ट्या आणि गॅसचे एक दोन फुगे होते. तिचा मूड खेळण्याचा होता. पहिल्या पायरीवर आल्या वर तिला दिसलं की एक गव्हाळ वर्णाचा तरूण मुलगा मामांशी बोलत होता. मामांशी बोलता बोलता तो थांबला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. साधारण साडीतही ती आकर्षक दिसत होती.
शब्दखुणा: