सकाळचे अकरा वाजत होते.

स्वप्नातलं भविष्य (भाग १ ला )

Submitted by मिरिंडा on 5 October, 2016 - 05:45

सकाळचे अकरा वाजत होते. उघड्या दरवाजावर जोरजोरात कुणीतरी थाप मारीत होते. रेखा, नैनाला लहानशा बाऊल मधून चहात बुडवलेला पाव खायला घाळीत होती. दारावरच्या थापा चालूच होत्या. म्हणून तिने पार्टिशनच्या बाहेर आपले डोके तिरके करून पाहिले. तर काय ? घरमालक शितोळे दरवाजा वाजवीत होते. डोक्यावर पांढरी टोपी , अंगात जुन्या पद्धतीचा सदरा आणि धोतर असा त्यांचा पेहराव होता. रेखा, हातातला बाऊल बाजूला ठेवून पदराला हात पुशीत , शक्यतोवर आवाजात मार्दव आणीत म्हणाली, " काय झालं काका ? " असं विचारल्यावर शितोळ्यांचा पारा अधिकच चढला. आधीच लाल गोरा असलेला म्हातारा, रागाने पिवळा होत म्हणाला, "काय झालं ?....

Subscribe to RSS - सकाळचे अकरा वाजत होते.