'मराठी कवीता

मी मराठी

Submitted by सुहास काकडे on 20 October, 2016 - 01:30

मी मराठी ..
सरस्वतीचे स्वर मी
आहे मला लक्ष्मीचे रूप
शक्तीचे सामर्थ्य माझ्यात
आहे निसर्गाशी एकरूप .... मी मराठी ..

ओंकाराचे अक्षर मी
आहे गणेशाची विद्या
श्रिरामाची वाचणे मी
साधु सन्ताची गाथा ....... मी मराठी ..

पावसाची रिमझिम मी
कोकिळेची मंजुळ वाणी
केसरीची मी सिंह गर्जना
गोदावरीचे खळखळणार पाणी ....... मी मराठी ..

ज्ञानेश्वरांची लेक मी
झाली तुकोबाची लाडली
विठ्ठलाच्या वारीतून मी
घरा घरात पोहचली...... मी मराठी ..

शब्दखुणा: 

पाणी

Submitted by R.Paikekar on 8 October, 2016 - 13:48

images.jpg
पाणी
पाण्यावाचुन घसा कोरडा,
सर्वांचा जिव कोंडला।
पाण्यामुळ बळीराज्याचे कर्ज वाढले,
जिव देऊन केले मोकले।

मुक्या जिवाचे हाल देखवेना,
काय करावे काय सुचेना।

पाण्यासाठी केला निसर्गाचा धावा,
निसर्ग म्हणाला पाहिले झाड़े लावा।

झाड़े लावून करू धरती हिरवीगार,
निसर्गाचे मानु आभार।

माणुस म्हणुन आपले कर्तव्य,
पाणी संवर्धन हेच आपले लक्ष।

एकतर्फी

Submitted by Poetic_ashish on 25 September, 2016 - 10:44

प्रेमाची साकेंतीक भाषा, कधी कळलीच नाही,
ह्र्द्यात आग लागूनही,ती कधी जळलीच नाही,
मला तिची जाणीव, कधी उमगलीच नाही,
अंत:करणात प्रेमाची आशा,कधी फळलीच नाही,

तिच्या डोळ्यातली निळाई,मला कधी भावलीच नाही,
प्रेमात चपळ असूनही, ती भावनांच्या मागे धावलीच नाही,
तिच्या खाणाखुणा मला कधी समजल्याच नाहीत,
तिचे बोलके डोळे, कधी काही बोललेच नाहीत,

ती एकतर्फी असूनही निराश कधी झालीच नाही,
काळाच्या पडद्याआड ती कधी गेली नाही,
तिने प्रेमाचा बाउ कधी केलाच नाही,
प्रितीची मर्यादा कधी पार केली नाही,

इश्काच्या अपयशाने दु:खी ती कधी झाली नाही,
सुंदर रुपाची मोहीनी तीने कधी घातली नाही,

शब्दखुणा: 

अमरप्रेम

Submitted by Poetic_ashish on 22 September, 2016 - 10:29

ती होती एक सुंदर जोडी, कधी करायची लाडीगोडी,
कुसूमांप्रमाणे त्यांच्यातही होती,निरासगता थोडीथोडी,
मनात त्यांच्या वसंत नांदत होता बाराही महीने,
मनात घायाळ झालं नव्हतं शंकाद्वेषाच्या सुईने,

प्रेम होते तयांचे वासनारहीत, अमर,
काया धवल होती जसा दुधाचा सागर,
लाखात एक असा, प्रणय होता लोभस,
पक्षीपक्षीण राजस, प्रेमी होते गोंडस,

पण हाय रे दैवा, पारधी , वैर्‍याने त्या साधला डाव,
न देता थोडाही अवधी, वर्मावरच घातला घाव,
आज हंसांची जोडी, वियोगात डुंबली,
जशी ताज्या जखमेला मिरची झोंबली,

पक्षिणीची शिकार झाली, त्या दोघांची कहाणीच संपली,
भयानक वास्तवाची भिषणता, आता त्याची सखी झाली,

शब्दखुणा: 

घायाळ

Submitted by Poetic_ashish on 22 September, 2016 - 09:46

चिंब मन, शहारले तन, मोहरलेय आज मन,
रसिके तू समोर येताच कसा दरवळला प्रेमसुगंध,
नजरेचा इशारा,प्रेमाचा नजारा, ह्र्द्य हरणारा,
राणी गं झालो मी घायाळ तरूण बावरा,

तरूणाईच्या नाविन्याने निसर्ग हबकला अन् गतीने वाहला वारा,
वृक्ष प्रितीने न्हाऊन निघाले, सृष्टीने नूर पालटला सारा,
नूकताच फुटलेला अंकूर बोलला झाडाच्या पालवीला,
राणी गं झालो मी घायाळ तरूण बावरा,

भ्रमर सुगंधाने सूमनांच्या व्याकूळ झाला,प्रेमात वाहला,
पहील्या प्रितीच्या साक्षीनेच भ्रमराने मधुगंधपाश निवडला,
तो भ्रमर साधाभोळा, इश्कात गुंतला, अन् बोलला जुईच्या कळीला,
राणी गं झालो मी घायाळ तरूण बावरा,

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - 'मराठी कवीता