घायाळ

Submitted by Poetic_ashish on 22 September, 2016 - 09:46

चिंब मन, शहारले तन, मोहरलेय आज मन,
रसिके तू समोर येताच कसा दरवळला प्रेमसुगंध,
नजरेचा इशारा,प्रेमाचा नजारा, ह्र्द्य हरणारा,
राणी गं झालो मी घायाळ तरूण बावरा,

तरूणाईच्या नाविन्याने निसर्ग हबकला अन् गतीने वाहला वारा,
वृक्ष प्रितीने न्हाऊन निघाले, सृष्टीने नूर पालटला सारा,
नूकताच फुटलेला अंकूर बोलला झाडाच्या पालवीला,
राणी गं झालो मी घायाळ तरूण बावरा,

भ्रमर सुगंधाने सूमनांच्या व्याकूळ झाला,प्रेमात वाहला,
पहील्या प्रितीच्या साक्षीनेच भ्रमराने मधुगंधपाश निवडला,
तो भ्रमर साधाभोळा, इश्कात गुंतला, अन् बोलला जुईच्या कळीला,
राणी गं झालो मी घायाळ तरूण बावरा,

तूझ्या नजरेने गुपित उघडले, डोळ्यातून डोळ्यांना मिळणारे,
मनाच्या मनातून जपणारे अन् ह्रुद्याशी एकरूप होणारे,
हे जग सगळे बहुतेक प्रेमच म्हणते या गुपिताला,
राणी गं झालो मी घायाळ तरूण बावरा,

कोपरा न् कोपरा व्यापला आहेस तू माझ्या मनातला,
तरी का महत्व आहे या ह्रुद्यात तूझ्या उपस्थितीला,
इलाज देशील का तू माझ्या भग्न ह्रुद्याला,
राणी गं झालो मी घायाळ तरूण बावरा,

कवी आशिष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users