स्कॉच व्हिस्की

स्कॉच व्हिस्की भाग ३ (अंतिम) - विविध प्रकार आणि पिण्याची पद्धत

Submitted by सुमुक्ता on 2 September, 2015 - 04:28

स्कॉच व्हिस्की भाग १ - इतिहास आणि कृती - http://www.maayboli.com/node/53599
स्कॉच व्हिस्की भाग २ - एजिंग - http://www.maayboli.com/node/53685

स्कॉच व्हिस्की आवडणाऱ्या लोकांना निश्चितपणे माहित हवेत ते स्कॉच व्हिस्कीचे वेगवेगळे प्रकार आणि त्यातील फरक.

सिंगल मॉल्ट - एकाच डिस्टीलरीमध्ये १००% मॉल्टेड बार्लीपासून बनलेल्या व्हिस्कीला सिंगल मॉल्ट व्हिस्की म्हणतात. ही व्हिस्की कमीत कमी ३ वर्षे स्कॉटलंडमध्ये ओकच्या कास्कमध्ये मॅचुअर झालेली असली पहिजे. २३ नोव्हेंबर २०१२ पासून सिंगल मॉल्ट स्कॉच व्हिस्की ही स्कॉटलंडमध्येच बाटलीत भरली गेली पाहिजे असा नियम आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

स्कॉच व्हिस्की भाग २ - एजिंग

Submitted by सुमुक्ता on 27 April, 2015 - 08:47

स्कॉच व्हिस्की भाग १ - इतिहास आणि कृती येथे वाचा http://www.maayboli.com/node/53599

स्कॉच व्हिस्कीचे एजिंग कमीत कमी ३ वर्षे केले जाते. तयार केलेले स्पिरीट जर तीन वर्षे ओकच्या कास्क मध्ये साठविले गेले नसेल तर त्याला व्हिस्की म्हणत नाहीत आणि असे स्पिरीट व्हिस्की म्हणून विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. तर स्कॉच व्हिस्की हे नाव प्राप्त होण्यासाठी तयार केलेले स्पिरीट कमीत कमी तीन वर्षे स्कॉटलंडमध्येच साठवावे लागते. एजिंगसाठी स्कॉच व्हिस्की ओकच्या कास्क मध्ये साठविली जाते.

विषय: 
शब्दखुणा: 

स्कॉच व्हिस्की भाग १ - इतिहास आणि कृती

Submitted by सुमुक्ता on 21 April, 2015 - 04:54

मी दारू पीत नाही तरीही जगातील एवढे लोकप्रिय पेय बनवतात कसे आणि लोकांना का आवडते ह्याची उत्सुकता मात्र मला नक्कीच होती. स्कॉच व्हिस्की आणि डिस्टीलरीज हा स्कॉटलंडच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. स्कॉटलंडला दिलेली भेट ही एका तरी डिस्टीलरीला भेट दिल्याशिवाय संपूर्ण होणे अशक्य आहे. आजपर्यंत अनेक डिस्टीलरीजना भेटी दिल्या, स्कॉच व्हिस्कीबद्दल वाचन केले त्यावरून हा लेख लिहित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - स्कॉच व्हिस्की