फ्रेंच ओपन टेनिस २०२१.

Submitted by मुकुंद on 19 May, 2021 - 17:32

चला मंडळी! आहात का तयार यंदाच्या फ्रेंच ओपन आवृत्तीसाठी?

सालाबादप्रमाणे याही वर्षी नदालच विजेतेपदाचा चषक उचलताना दिसणार की जोकोव्हिक/ झव्हेरोव्ह/ थिम/ सिट्सिपास पैकी एक नदालचा इथला जिंकण्याचा मक्ता संपवणार?

२ आठवड्यापुर्वी माद्रिद ओपनमधे झेव्हेरोव्हने नदालला उपांत्यपुर्व फेरीतच गारद करुन थोडी खळबळ माजवली पण गेल्या आठ्वड्यात नदालने इटालियन ओपनमधे झव्हेरोव्हला उपांत्यपुर्व फेरीत हरवुन त्या पराभवाचे उट्टे काढले. तेवढेच नाही तर इटालियन ओपनच्या फायनलमधे नदालने जोकोव्हिकला हरवले व त्याचे तिथले १० वे इटालियन ओपन विजेतेपद जिंकुन त्याच्या गोटात सगळे आलबेल आहे हे दाखवुन दिले.

मी इटालियन ओपन फायनल बघीतली. ती बघताना नदाल व जोकिव्हिक ज्या पद्धतीने खेळत होते ते बघताना त्यांच्यातली ही मॅच २०२१ मधली नसुन २०११ मधली आहे असे जरी मला कोणी सांगीतले असते तर ते मला खरेच वाटले असते! त्या दोघांचा फिटनेस व खेळ अगदी ते १० वर्षापुर्वी जसे खेळत होते तसाच्या तसाच अजुन आहे! केवळ अविश्वसनिय!

ती फायनल बघुन यंदाच्या फ्रेंच ओपनच्या मेजवानीमधे आपल्यापुढे काय वाढले असेल या विचाराने माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटले आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेडररने आधीच हात वर केलेत. यावेळेस नविन गँग पैकी कोणीतरी जिंकेल अस वाटतय. राफा फॉर्मात असला तरी तरूणाई विरूद्ध ५ सेट पर्यंत टिकण्याची क्षमता राहिली आहे की नाही माहित नाही.
महिलांमधे इगा स्वियाटेक (मुलींमधे म्हणायला पाहिजे) फॉर्मात आहे.

आता खरी फ्रेंच ओपन स्पर्धा सुरु झाली.

ज्या पातळीवर टॉप ५ टेनिस प्लेयर्स खेळत आहेत ते बघुन बहुतेक टेनिस स्पर्धा आता फक्त ३ राउंड्सच्याच कराव्यात असे मला वाटु लागले आहे.

ज्या पद्धतीने सिट्सिपास खेळतोय ते बघुन नदालला तो टफ फाइट देउ शकेल अस वाटतय, अर्थात नदालला आधी श्वार्ट्झमन व जोकोव्हिकला हरवायला लागेल. तो ते करेल अस वाटतय त्याच्या पहिल्या ४ राउंड्स बघुन.

फेडररने आता फ्रेंच ओपनचा नाद सोडुन द्यावा. विंबल्डनला ड्रॉ अनुकुल असेल तर तिथे तो अजुन जिंकु शकतो.

मस्त झाली 3 सेट पर्यंत राफा आणि schawartzman ची match !!! चौथ्या सेट मध्ये अचानक राफा चा खेळ इतका बहरला की ते बघून डिअगो नी नांगीच टाकली असे वाटले . दोघांची देहबोली चौथ्या सेट मध्ये पूर्णपणे विरुद्ध होती .

अश्विनी,अचुक निरिक्षण!सहमत.

पण मी ईथे आजच्या दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यांबद्दल लिहायला आलो.

पहिला मस्तच झाला पण राफा- जोकोव्हिच आजची मॅच ज्यांनी पाहीली ते खरच भाग्यवान! खासकरुन पहिले ३ सेट्स. काय पातळी होती टेनिसची!काय ते एक एक शॉट्स ! काय ते एक एक अँगल्स होते शॉट्सचे! काय ते एक एक ड्रॉप शॉट्स आणी काय त्या रॅलीज! सगळेच अजब!

पण शेवटी जोकोव्हिच हा सामना जिंकला ते उचितच झाले. तो आज राफापेक्षा खरच चांगला खेळला.

राफाच्या पहिल्या सर्व्हिसने त्याला आज दगा दिला व त्यामुळे त्याचे डबल फॉल्टही खुप झाले.

चौथ्या सेटमधे फारच अँटीक्लायमॅक्स झाला. पहिल्या ३ सेटसाठी साडेतिन तास अत्यंत उच्च प्रतिचे टेनिसचे प्रात्यक्षिक या दोघांनी दाखवल्यावर चौथा सेट १५-२० मिनिटात उरकला गेला.

मला वाटते की नदालचा फ्रेंच ओपनमधला अस्त आज आपल्याला पाहायला मिळाला. मला नाही वाटत की परत तो फ्रेंच ओपन जिंकेल. पण त्याने इथे १३ वेळा जिंकुन एक जबरदस्त लेगसी मागे ठेवली आहे.

जोकोव्हिच ज्या पद्धतिने खेळत आहे ते बघुन या वर्षी तो इल्युझिव्ह ग्रँड स्लॅम पुर्ण करेल अस मला वाटते व नदाल, फेडररला मागे टाकुन तोच सगळ्यात जास्त ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम करेल असेच मला वाटते.

पण त्याधी त्याला नविन उदयास येणार्‍या टेलंटेड सिस्टिपासला रविवारी हरवायला लागेल. पण फायनलमधे जाकोव्हिच आजच्यासारखा खेळला तर सिस्टिपासला तो सहज हरवेल.

जोकोव्हिच ज्या पद्धतिने खेळत आहे ते बघुन या वर्षी तो इल्युझिव्ह ग्रँड स्लॅम पुर्ण करेल अस मला वाटते व नदाल, फेडररला मागे टाकुन तोच सगळ्यात जास्त ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम करेल असेच मला वाटते.
>>>+ 1
ही इज बेटर than फेडेक्स अँड राफा

मस्त च झाली राफा आणि जोकोविच ची match !!!! एकेका गुणासाठी प्रचंड झगडत होते दोघे . ते बघून फेडरर नी माघार घेतली ते बरे झाले असे वाटले . पण मला नदाल हरेल असे वाटले नव्हते . फ्रेंच ओपन म्हणजे नदाल असे समीकरण कुठंतरी डोक्यात असेल कदाचित. रविवारी कळेलच विजेता कोण !!

कालचा राफा वि. जोकोव्हिच सामना जबरदस्त झाला जे तुम्ही सगळे म्हणताय त्याच्याशी पुर्ण सहमत!

या दोघात अजुनपर्यंत ५९ सामने झाले आहेत. ते बहुतेक सगळेच अटितटीचे झाले आहेत.

यांच्यातली प्रत्येक मॅच बघताना असे वाटते की हे दोघेही एकमेकांचा खेळ उंचवायला एकमेकांना मदत करतात. कारण या दोघांनाही माहीत आहे की प्रत्येक पॉइंट जिंकायला सुमार दर्जाचे टेनिस खेळुन चालणार नाही. प्रत्येक पॉइंट जिंकायला त्यांना त्यांच्या पोतडीतुन जबरदस्त शॉट काढायला लागतो. कारण या दोघात कुठलीही सर्व्हिस,कुठलाही अँगल,कुठलाही ड्रॉप शॉट किंवा लॉब व कुठलेही प्लेसमेंट हंट डाउन करायची क्षमता आहे.

म्हणुनच मग या दोघांमधल्या बहुतेक मॅचमधे २५-२५ शॉट्सच्या रॅलीज आपल्याला बघायला मिळतात. अगदी अशक्य वाटतील असे अँगल्स असलेले शॉट्सचे प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळते. ९-९ किंवा १०-१० मिनिटांचा एक एक गेम यांच्यात चालतो. कालचा सामनाही त्याला अपवाद नव्हता.

मग त्याची परिणीती यांच्यातला सामना म्हणजे आपल्यासारख्या टेनिसप्रेमींना एक मेजवानीच असते व यांच्यातला सामना आपल्याला एक अदभुत व अविस्मरणिय अनुभव देउन जातो. माझ्या तोंडातुन कालचा सामना बघताना व्हॉट अ शॉट! व्हॉट अ‍ॅन अँगल! व्हॉट अ रिकव्हरी! असे उदगार वारंवार येत होते व मान शेक करत या दोघांच्या उच्च पातळीच्या टेनिस खेळाचा आस्वाद मी लुटत होतो.

या दोघातल्या एपिक मॅचेस बघता आपल्याला असे सतत वाटत राहते की यापेक्षा जास्त वरची टेनिस खेळाची लेव्हल अशक्य असेल.

पण तरीही हे दोघे एकमेकांबरोबर प्रत्येक वेळी खेळताना टेनिसची अजुन एक नविन पातळी ते आपल्याला दाखवतात . मग आपण तसला सब्लाइम पातळीवरचा त्यांचा तो गेम बघुन तोंडात बोटे घालतो! कालचा त्यांच्यातला सामना असाच आपल्याला तोंडात बोटे घालायला लावणारा होता.

हे खरच ट्रॅजिक आहे की अश्या उच्च दर्जाचे सब्लाइम टेनिस खेळुनही या दोघांपैकी एक हरणार असतो.

पण म्हणुनच मला असे वाटते की राफाला खुप वाइट वाटले असेल काल हरल्यावर. बट बाय नो मिन्स ही शुड वॉक विथ हिज हेड डाउन आफ्टर हिज लॉस टु जोकोव्हिच!

खर म्हणजे कालच्या यांच्यातल्या एपिक सामन्यानंतर खरा विनर म्हणजे खुद्द टेनिस गेम स्वतःच होता!

तळटिपः कालच्या सामन्यात जेव्हा जेव्हा ते स्लो मोशनमधे पॉइंटचा रिप्ले दाखवत होते तेव्हा तेव्हा स्लो मोशनमधे बघताना अशक्य वाटणारे क्रॉस कोर्ट, डाउन द लाइन, ड्रॉप शॉट व लॉब्स ते दोघे किती ग्रेसफुलरित्या चपळाइने व लिलया हंट डाउन करत होते ते बघताना डोळ्याचे पारणे फिटत होते! या दोघांचा खेळ, फिटनेस व फुटवर्क स्लो मोशनमधे बघताना एखादी सुंदर आर्ट बघताना आपल्याला जसे वाटते तसेच मला वाटत होते. खरच या दोघांनी टेनिस खेळाला एका वेगळ्याच पातळीवर नेवुन ठेवले आहे.

छान प्रतिसाद मुकुंद, काल खरंच तीन पर्यंत जागणे वर्थ होते. पण शेवटच्या सेटला नदालची सर्व्हीस गंडली आणि जोकर ने पूर्ण फायदा घेतला. पण तसाही तो काल उत्तम खेळत होता. क्ले कोर्टच्या बादशहावर दडपण आणून खेळणे हे बघणं मेजवानी होती माझ्यासाठी.

लोकहो , बघताय का ? चांगले कमबॅक केलेय नोवाक ने . पाहिले दोन्ही सेट गेले पण आता दमवतोय स्टेफानोस ला.

जिंकला जोकर... आय am सो हॅप्पी...
वेल डीझरविंग...
त्या लहान मुलाला रॅकेट देऊन तू सर्वांचे मन जिंकलेस नोले...

काय बोलणार जोकोव्हिकबद्दल?

१९ ग्रँड स्लॅम्स अँड काउंटींग! आधी फेडरर व मग नदाल यांच्या सावलीत नेहमीच उपेक्षित राहीलेला जोकोव्हिच आता त्या दोघांना मागे टाकुन त्यांच्या पुढे जाण्याच्या उंबरठ्यावर येउन पोहोचला आहे.

टेक अ बाव जोकोव्हिच!

आज( परत एकदा!) त्याने दाखवुन दिले की कुठल्याही खेळात नुसते स्किल असुन उपयोगी नाही तर त्या खेळाच्या शिखरावर विराजमान व्हायचे असेल तर प्रचंड मोठा मानसीक कणखरपणा, चिकाटी व स्वतःवरचा आत्मविश्वासही तेवढाच महत्वाचा असतो.

हे जोकोव्हिकने त्याच्या दैदिप्यमान कारकिर्द्रित अनेक वेळा दाखवुन दिले आहे. २०२१ फ्रेंच ओपनही त्याला अपवाद नव्हते!

उपांत्य फेरीत नदालला पदच्युत करताना त्याने अत्त्युच्च प्रतिचे टेनिस दाखवुन दिल्यावरही आजच्या अंतिम सामन्यातही त ०-२ असे सेट्समधे मागे पडल्यावर परत एकदा त्याने त्याच्या तळ नसलेल्या मेंटल एनर्जिच्या रिझर्व्हॉयरचा पुरेपुर उपयोग केला व बिचार्‍या नवशिक्या सिस्टिपासला मेजर टुर्नामेंट कशी जिंकायची याचे मास्टरफुल प्रात्यक्षिक दिले! बिच्चारा सिस्टिपास! त्याचा रडवेला चेहरा बघवत नव्हता ट्रॉफी वितरण सोहळ्याच्या वेळी.

पण सिस्टिपासकडे नक्कीच खेळ आहे. तोही पुढे मल्टिपल ग्रँड स्लॅम्स जिंकु शकतो. त्याने आजच्या पराभवातुन मास्टर जोकोव्हिचकडुन होपफुली धडा शिकला असेल की जिंकण्यासाठी चिकाटी व नेव्हर गिव्ह अप अ‍ॅटिट्युड हेही तितकेच महत्वाचे असते जितके की आपला खेळ!

पण आजचा दिवसच नाही तर हे सर्व वर्षच जोकोव्हिचच्या कारकिर्द्रितले सोन्याचे वर्ष ठरु शकेल अश्या पद्धतिचे टेनिस तो खेळत आहे.

जोकोव्हिच, तुला मानाचा मुजरा!

तुम्ही खरंच छान लिहीता. पूर्ण पोस्टला अनुमोदन. जोकोविच वीस च्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय, अजून पुढे जाईल यात शंका नाही.
आणि तसीतसी पण पुढे येईल भविष्यात , सारी फॉर टायपो. जोकरला शुभेच्छा वीसाव्या ग्रॅंडस्लॅमसाठी.

आज( परत एकदा!) त्याने दाखवुन दिले की कुठल्याही खेळात नुसते स्किल असुन उपयोगी नाही तर त्या खेळाच्या शिखरावर विराजमान व्हायचे असेल तर प्रचंड मोठा मानसीक कणखरपणा, चिकाटी व स्वतःवरचा आत्मविश्वासही तेवढाच महत्वाचा असतो.
>>+ 1 आणि फिटनेस लेव्हल देखील... पाचवावा सेट तो असा खेळत होता जसा दुसरा सेट असावा...

>>> पण आजचा दिवसच नाही तर हे सर्व वर्षच जोकोव्हिचच्या कारकिर्द्रितले सोन्याचे वर्ष ठरु शकेल अश्या पद्धतिचे टेनिस तो खेळत आहे.

जोकोव्हिच, तुला मानाचा मुजरा!>>> तिसर्‍या सेट मध्ये सुध्दा अगदी निकराची लढत असतांना काय आत्मविश्वास होता त्याचा...... अप्रतिम प्रदर्शन ! सिस्टिपास ला अनुभव कमी पडला, पण ट्रॉफी देतांना एवढा रडवेला व्हायची अपेक्षा नवह्ती

मुकुंद , तुमचा पूर्ण प्रतिसाद छानच !! जोकोविच ने म्हटल्याप्रमाणे 48 तासात दोन्ही winning match खेळणे खरोखरच stressful आहे . पण त्याचा आत्मविश्वास आणि अनुभव खरोखर वाखाणण्याजोगा आहे . त्सितसीपास कडे पण गुणवत्ता आहे , पण अनुभव थोडा कमी पडला . आता वाट बघायची विम्बल्डन ची !!!

https://amp.cnn.com/cnn/2021/06/14/tennis/stefanos-tsitsipas-french-open....

सिस्टीपास रडवेला होण्याचे कारण हे असू शकते. त्याची आजी गेल्याची बातमी सामना सुरू होण्यापूर्वी पाचच मिनिटे अगोदर त्याला कळली होती

जोकोविच ने म्हटल्याप्रमाणे 48 तासात दोन्ही winning match खेळणे खरोखरच stressful आहे . पण त्याचा आत्मविश्वास आणि अनुभव खरोखर वाखाणण्याजोगा आहे >>>>>> खरंच आहे. जोकोविच is truly big inspiration for all. तीच भीती होती मला की तो दमलेला असेल सेमीमुळे आणि सुरवातीला दोन सेट गमावताना बघून ते खरंही वाटलं ,, पण ,, he again proved why he is world no. 1 . अशा मॅचेस या आधीही झालेल्या आहेत त्याच्या, नंतर पुढे आलाय अश्या. जोकोविच जिंकला की मनापासून आनंद होतो. Never give up attitude आणि आत्मविश्वास are the keys. हॅट्स ऑफ टू हीम.

मुकुंद, मस्त लिहिलं आहेस. जोको आणि नदाल्ची मॅच बघताना सँंप्रस्/अगासीचे ड्युअल्स आठवत होते. जोको/नदालची रायव्ल्री कदाचित "त्या लेवलची" नसेल, बट इट वाज स्टिल कॅप्टिवेटिंग...

Pages