फळ

मन म्हणते पळ पळ

Submitted by तो मी नव्हेच on 15 August, 2020 - 03:57

मन म्हणते पळ पळ
दाबून टाक जुनी कळ
थांबून करतोस माझा छळ
चल सरळ, तिथे वळ
दुसरी इच्छा कर जवळ
मन म्हणते पळ पळ

मन म्हणते पळ पळ
नवी इच्छा नवे फळ
तिथे सारे जग नितळ
तिथेही पायीं सळसळ
तिथेही फळावर गरळ
मन म्हणते पळ पळ

मन म्हणते पळ पळ
जहरी दंश पुन्हा कळ
वर्मी फटका अदृश्य वळ
जीर्ण श्वासास अश्रूंची खळ
गात्र म्हणते छळ छळ
मन म्हणते पळ पळ

विवेक म्हणे थोडं थांब
घे थोडा तू विराम
अशाच एका इच्छेपोटी
हरली सीता, शोधिती राम
माझ्या मना थोडं थांब
माझ्या मना थोडं थांब

शब्दखुणा: 

फळांचा गुच्छ - एक उत्तम स्टार्टर

Submitted by गोपिका on 1 July, 2014 - 11:08

मुलीचा वाढदिवसानिमित्त बनवला होता हा गुच्छ...बच्चे कंपनी विशेष तुटून पडली ह्यावर.मोठे ही खाल्ले.नंतर पिझ्झा आणी केक खाऊन कॅलरीस वाढव्ल्याचि अपराधि भावना कोणाचा चेहर्यावर नव्हति Proud

१. आधी कलिंगड व्यवस्थित कापून घेतल....
२. अनन्स व किवि कापून घेतल
३.फोटोत दाखवल्या प्रमाणे फळे काड्यांध्ये टोचुन घेऊन ते नंतर कलिंगड्यावर सजवावे

टिप्स :कलिंगड शक्य तेवढ उशीरा कापवे(कार्यक्रमाचा ४५ मिन्स आधि). जेणे करून त्याचा ताजे पणा टिकून राहिल.
लवकर कापणार असाल तर फ्रिज मध्ये न ठेवता त्यावर प्लस्टिच ने झाकावे.फ्रिज मधे ठेवल्यास त्याला सुरकुत्या पडून,त्याचा ताजे पणा निघून जातो.

विषय: 
Subscribe to RSS - फळ