मन्या

मन्या

Submitted by बेफ़िकीर on 7 May, 2016 - 12:57

"बिडी दे"

"तुझी तू विकत घे"

"बेनाम बादशहामधल्या जुही चावलाच्या ब्लाऊजसारखी टाईट हालत आहे आपली"

"घे"

"थँक्स"

मन्याच्या उपमेवर नाही, जुही चावलाच्या टाईट ब्लाऊजवर नाही पण मन्याच्या 'जग इज टेकन फॉर ग्रॅन्टेड'वाल्या देहबोलीसमोर नेहमीप्रमाणे शरणागती पत्करत मी बिडी ऑफर केली. त्याला ब्रँडचे वावडे नव्हते. सिगारेट, बाई, चर्चा, चिता आणि होळी ह्या पेटवण्याच्या बाबी आहेत ह्यावर ठाम असलेला मन्या म्हणाला:

"सॉरी, आज तुझ्याबरोबर बसता नाही येणार"

"बोलवतंय कोण भडव्या तुला?"

विषय: 
शब्दखुणा: 

विषय क्र. २ मन्या

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 24 June, 2014 - 03:26

मन्या , मनोज बाळकॄष्ण जोशी,उंची ४ फुट १० इंच. लहानपणी ब्रेन ट्युमर ने त्रस्त होता ऑपरेशन केल्यावर उंची तेवढी वाढली नाही. म्हणतात ना मुर्ती लहान पण किर्ती महान, त्यातला काहीसा. हा जेव्हा आमच्या नगरात रहायला आला तेव्हाच त्याची ओळख झाली. नविन घर बांधकाम चालु होते, हा घराला पाणि टाकायला अधुन मधुन येत असे. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. आणि बि.कॉम. ला आम्ही सोबतच आलो. मन्या अभ्यासात खुप हुशार. मी त्या मानानी साधारणच. आम्ही दोघान्हीही अभ्यास सोबत करायचे ठरविले. अभ्यास तर करत होतो. पण माझे अकाऊंट,सांख्यिकी हे विषय कच्चे होते.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मन्या