परदेशी प्रवास

लंडन टू नासिक ऑन व्हील्स, ४५ दिवस, १७,००० किमी.

Submitted by संपदा on 27 May, 2015 - 18:29

नासिकचे तीन व्यावसायिक आशिष कटारिया, संजीव बाफना आणि राजीव पारेख "लंडन टू नासिक ऑन व्हील्स" अशी साहसी मोहीम सध्या यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. "A World Without Boundaries" असे या मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे. या तिघांचा प्रवास ८ मे रोजी लंडनहून सुरू झाला असून १२ देशांतून १७,००० किमी अंतर पार करत नासिक येथे साधारण १८ - १९ जूनपर्यंत त्यांचे आगमन होईल. MH-15-EP-6723 अशा भारतीय रजिस्ट्रेशनच्या टोयोटा फॉर्च्युनरमधून हा सर्व प्रवास करण्यात येत आहे. खालील वेबसाईटवर रोजचे अपडेट्स बघता येतील.
http://www.globewheelers.com/#home_section

विषय: 

क्वाला लंपूरबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by मृदुला देसाई on 12 February, 2014 - 17:57

नमस्कार मंडळी,
पुढील महिन्यात क्वाला लंपूरला जाण्याचा योग येत आहे. त्यासाठी मला थोडे मार्गदर्शन हवे आहे. मी, माझा नवरा आणि आमचे पिल्लू असे आम्ही तिघेच आहोत. मुलगी पाच वर्षांची असल्यामुळे थोडी काळजी वाटत आहे.
जालावर शोध घेतलं तेव्हा बाटू गुहा, पेट्रोनास टॉवर, लांगकावी, लेगोसिटी, गेंटिंग हायलंड, बर्ड पार्क, जालान अलोरबद्दल या पर्यटन स्थळांबद्दल माहिती मिळाली. तिकडे खाण्या पिण्याची एकंदर रेलचेल आहे असे लक्षात येते. काय खावे ते सगळेच सांगत आहेत पण काय खाउ नये, खाण्याच्या बाबतीत काय काळजी घ्यावी याबद्दल कुठेच उल्लेख नाही.

विषय: 
Subscribe to RSS - परदेशी प्रवास