अर्थकारण

तडका - डेली रूटींग

Submitted by vishal maske on 27 September, 2015 - 21:09

डेली रूटींग

त्याच-त्याच गोष्टी करून
कधी मनंही विटले जातात
रोज-रोजच्या गोष्टींपासुन
मुद्दामहून टर्न घेतले जातात

कोणी सांगण्याची गरज नाही
आपणंच समजुन घ्यावं लागतं
कितीही टर्न घेतले तरीही
डेली रूटींगवर यावं लागतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - टोल

Submitted by vishal maske on 26 September, 2015 - 11:37

टोल

टोल बंदच्या मागणीत
हेच तर पुढे-पुढे होते
पुढाकार घेत-घेत
तळमळीचे राडे होते

पण चित्र पालटले अन्
तेच सत्तेत बसले आहेत
विसंबुन बसलेले त्यांच्यावर
टोल बाबतीत फसले आहेत,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - प्रॉपर्टी

Submitted by vishal maske on 29 August, 2015 - 22:49

प्रॉपर्टी

ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे
त्याला त्याची किंमत कळते
कित्तेक कित्तेक कामांसाठी
प्रॉपर्टीनेच तर हिंमत मिळते

स्वाभिमानाची मनामध्ये
प्रॉपर्टी ताकत भरू शकते
तर कधी आपलीच प्रॉपर्टी
आपल्याला घातक ठरू शकते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कांदा खाण्यासाठी

Submitted by vishal maske on 25 August, 2015 - 07:47

कांदा खाण्यासाठी

हल्ली चर्चा-चर्चांना लागलेला
कांदा भाववाढीचा वास आहे
रोज कांदे खाणारांचाही आता
बिना कांद्याचाच घास आहे

वाढत्या भावामुळे कदाचित कांदे
दैनंदिन जेवनातुन हरवले जातील
अन् कांदा खाण्यासाठी मात्र
आठवडी दिवस ठरवले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कांद्याच्या धंद्यात

Submitted by vishal maske on 23 August, 2015 - 21:22

कांद्याच्या धंद्यात

कांद्याचा तुटवडा भासताच
व्यापार्‍यांनी भाव वाढवले
ज्यांनी कांद्याला घडवले
कांद्याने त्यांनाही रडवले

व्यापारी मित्रांनाही कांदा
शेतकर्‍यांनीच पुरवला आहे
मात्र या कांद्याच्या धंद्यामधून
शेतकरी जणू हरवला आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कांद्याचा भाव

Submitted by vishal maske on 23 August, 2015 - 10:47

कांद्याचा भाव,...

ज्यांनी पिकवले कांदे
त्यांचेच झालेत वांदे
तरीही जोरात आहेत
इथे कांद्याचेच धंदे

कांद्याची झालेली भाववाढ
हा कटू नीतीचा डाव आहे
ज्यांनी कांदे पिकवले नाही
त्यांच्याच कांद्याला भाव आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - यश मिळवताना

Submitted by vishal maske on 22 August, 2015 - 11:11

यश मिळवताना

यश मिळवायचं असेल तर
प्रयत्न हे करावे लागतात
ध्येयपुर्तीचे ध्येय वेडे
मनामध्ये भरावे लागतात

ध्येयही त्यांचेच पुर्ण होतात
ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते
मात्र इच्छा हिन माणसांकडून
उदासिनतेचीच खळबळ असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

TMC , कर्जत टी एम सी उर्फ शेल्टरेक्स

Submitted by labadkolha11 on 20 August, 2015 - 14:34

कर्जत टी एम सी उर्फ शेल्टरेक्स : घर गुंतवणूक

कर्जतला तानाजी मालुसरे सिटी असा भव्य गृहसंकल्प होता. पण्बिल्डर आर्थिक अडचणीत येऊन गुंतवणूकदारांची अवस्था गडही गेला व सिंहही गेला अशी होऊन तो बंद पडला होता.

पण हा प्रकल्प आता शेल्टरेक्स या नावाने पुन्हा सुरु झालेला आहे.

गुंतवणुकीस योग्य आहे का ?

कर्जतमध्ये फ्लॅटसाठी आणखी चांगले पर्याय आहेत का ?

या निमित्त्याने याच धाग्यावर ' सेकंड होम : सत्य की थोतांड ? ' हीही चर्चा करावी.

तडका - फिल्मी रेकॉर्ड

Submitted by vishal maske on 23 July, 2015 - 21:34

फिल्मी रेकॉर्ड

कुणी तरी बनवुन जातो
बाकीचे मग मोडत बसतात
वेग-वेगळ्या कमाईने
नवा रेकॉर्ड जोडत असतात

कुणी दुसर्‍याचे तर कुणी
स्वत:चेच तोडत असतात
पण त्यांचे रेकॉर्ड घडवण्यासाठी
प्रेक्षकच धडपडत असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - लाच

Submitted by vishal maske on 15 July, 2015 - 11:01

लाच

कधी टेबला वरून असते
कधी टेबला खालुन असते
कधी-कधी न बोलताच तर
कधी-कधी बोलुन असते

दिली-घेतली जाणारी लाच
दोन्हीही बाजुने गुन्हा असते
कायद्यानं गुन्हा असली तरी
वास्तवात पुन्हा-पुन्हा असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - अर्थकारण