वेगळा

वेगळा भाग - ६

Submitted by निशा राकेश on 9 May, 2022 - 23:33

भाग -६

अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता
अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो.

“अरे ये गयबान्या, काय बोल्ला तू , बाबूच काय “अनिल आता जवळ जवळ अशोक च्या अंगावर येऊ लागतो.

“काय बाबू च , बाबूच काय नाय, कोण बोल्ल बाबू, तो तर , तो तर झोपलाय तिकडे” अशोक ने कसबस त्याच वाक्य’ पूर केल.
त्या सर्व आवाजाने मागच्या अंगणात झोपलेले बायडा चे वडील आबा त्यांना जाग येते, ते डोळे चोळत बाहेर येतात.

“काय कालवा चालाय , काय ग बायडे कोण हे धोग “ आबांनी तिला विचारतात.

शब्दखुणा: 

वेगळा भाग - ५

Submitted by निशा राकेश on 5 May, 2022 - 22:12

भाग – ५

अशोक सोबत झालेल्या त्या बोलण्यामुळे बाबू पुढचे काही दिवस अशोकला भेटलाच नाही ,
शाळेत जरी तो त्याला दिसला तरी तो त्याला टाळू लागला, एकटा शाळेत येऊ जाऊ लागला.
संध्याकाळ चा बराच वेळ दत्त मंदिरात घालवू लागला .त्या दिवसानंतर मात्र अशोक आणि आपल्यात खूप फरक आहे ,
त्याचे आणि आपले विचार हे खूप वेगळे आहेत, अशोक आपला मित्र कधीच होऊ शकत नाही ह्याची
जणू खात्रीच बाबुला वाटू लागली होतीं,

अशोक ने देखील कधी न कधी बाबू स्वतःहून त्याच्याशी बोलेल ह्याची वाट पाहू लागला ,
पण नंतर त्याचा संयम तुटला आणि त्याने बाबुला शाळेतून घरी जाताना अडवलं .

शब्दखुणा: 

वेगळा भाग - ३

Submitted by निशा राकेश on 2 May, 2022 - 22:41

भाग ३

दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?”

“ भेटेन कि , काही काम होत का “ बाबूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत.

“हो , जरा एका ठिकाणी येशील माझ्या सोबत ,माझे घरचे मला एकट्याला पाठवायचे नाहीत , म्हणून तुला विचारतोय “

“ बर , पण नक्की जायचय कुठे , कारण मला देखील घरी सांगाव लागेल आईला “ बाबू म्हणाला.

“अस आहे का , आईला सांग दत्त मंदिरात जातोय म्हणून, ठीक आहे , संध्याकाळी भेटू मग “ अस म्हणून अशोक लगबगीने त्याच्या घराकडे निघून गेला.

शब्दखुणा: 

वेगळा - भाग - २

Submitted by निशा राकेश on 30 April, 2022 - 07:31

भाग -२

जवळ जवळ पंधरा दिवस बाबूचा पाय हा बांधलेल्या अवस्थेतच होता, त्या काळात बायडा दोन तीन वेळा घरी येऊन त्याची विचारपूस करून गेली, ती घरी येई तेव्हा बाबू जागा असला तरी झोपेचे सोंग घेऊन नुसता पडून राही, मग ती त्या आईकडे किंवा बहिणीकडे चौकशी करून निघून जाई, एक दिवस मात्र जेव्हा ती घरी आली तेव्हा बाबू खाटेवर चहा पीत बसला होता , तेव्हा त्याला कुठे तोंड लपवू अस झाल होत , पण आता तिच्याशी बोलण्या शिवाय काही पर्याय न्हवता.,

बायडा तो जागा आहे हे पाहून त्याच्या जवळ जाऊन बसली आणि त्याच्या दुखावलेल्या पायाला नकळत तिने हात लावला,

शब्दखुणा: 

वेगळा - भाग – १

Submitted by निशा राकेश on 26 April, 2022 - 21:21

अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच - साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती, तो जिथे झोपायचा त्या घराच्या ओसरीला लागुनच एक सार्वजनिक नळ होता सकाळी सर्व वस्ती तिकडे येऊन पाणी भरायची, तिकडे त्यांची कलकल , भांडण , पण ह्याला मात्र जणू ते नेहमी होत, त्याला त्यातही गाढ झोप लागलेली असायची.

शब्दखुणा: 

वेगळा

Submitted by जयन्ता५२ on 23 March, 2014 - 04:05

कालचा चंद्र जरासा
वेगळा वाटला म्हणून
जवळ जाऊन निरखून पाहिल्यावर
कळलं की
त्याच्यावर खालच्या बाजूला
बारीक अक्षरात
'एक्सपायरी डेट' छापलेली आहे
आणि त्याखाली
'मेड इन चायना'....

------- जयन्ता५२

शब्दखुणा: 

वेगळा

Submitted by श्रीवल्लभ खंडाळीकर on 18 September, 2013 - 13:40

राहिलो तुम्हात पण राहिलो मी आगळा
स्वप्न हे गुंफीत जातो छंद माझा वेगळा

कार्य हे अर्पित असतो दूर देशीच्या स्थळा
अंतरी शोधीत असतो छत्रपतींचा मावळा

उत्तरे शोधीत असतो, मार्ग क्रमितो स्वबळा
अंतरी विनवीत असतो गोकुळीचा सावळा

विनोदी बोल बोलतो हासवाया वर्तुळा
ज्याची त्याला असती मग अंतरीच्या या कळा

वर्ण हे सोडीत जातो भेदीत जातो या मळा
ओलांडतो सीमा श्वास घ्याया मोकळा

http://gujmanatle.blogspot.in/2013/09/blog-post_16.html

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - वेगळा