श्रीनगर

श्रीनगर ट्युलिप गार्डन भाग 1

Submitted by कांदापोहे on 3 May, 2017 - 01:28

मार्च महिन्यात काश्मिरला फिरायला जायचे निश्चित झाल्यावर जवळची ठिकाणे त्या बद्दलची माहिती वाचताना 2 3 ठिकाणी अचानक कळले की साधारण आम्ही ज्या आठवड्यात श्रीनगर मध्ये जाणार त्याच आठवड्यात वर्षातून एकदा ट्युलिप फेस्टिव्हल असते .

श्रीनगर मधल्या सिराज बागेत वर्षातून एकदा ट्युलिप फेस्टिव्हल असते व मार्चच्या पहिल्या आठवड्यात 15 दिवस ही बाग पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण ठरते.

1 एप्रिल ला उदघाटन सोहळा होता व आम्ही 30 मार्चला श्रीनगरला पोचलो होतो. पोचल्या पोचल्या आमच्या ड्रायव्हरने सांगितले की आपण ट्युलिप गार्डनला जाऊ शकतो. वेळ होताच त्यामुळे बाकी काही न बघता पाहिले या बागेत गेलो.

व्यक्तीचित्रण - श्रीनगर काश्मिर- डाल सरोवर.

Submitted by कांदापोहे on 13 April, 2017 - 02:43

मार्च संपता संपता काश्मिरमधे एक आठवडा फिरुन आलो. संपुर्ण प्रवासात श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग व सोनमर्ग येते जाऊन आलो.

२ दिवस हाऊसबोटमधे राहिले असताना व्हेनीस किंवा थायलंडप्रमाणे इथेही पाण्यावर एक मार्केट उभे आहे व तुम्ही शिकारा घेतला व फिरलात की पाण-फिरते विक्रेते येत रहातात. अशाच काही विक्रेत्यांची प्रकाशचित्रे सादर करत आहे.

दल सरोवरामधल्या हाऊसबोटमधे जाण्याकरता छोट्या बोटींचा वापर अनिवार्य आहे. तुमचे बुकिंग असलेल्या हाऊसबोटमधे सोडण्याकरता अशा शिकार्‍यांचा किंवा बोटींचा वापर करावा लागतो.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे... भाग 1

Submitted by शशिकांत ओक on 2 March, 2015 - 09:06

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे... भाग 1
 अरूण वेढीकर.jpg
मस्त कलंदर अरुण वेढीकरचा तरुणपणातील सायकलनामा.

श्रीनगर मध्ये राहाण्याचे, फिरण्याचे आणी शॉपिंगचे ठिकाण सुचवा.

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:07

आम्ही २९ ऑगस्ट दुपारपासून ३० ऑगस्ट अख्खा दिवस श्रीनगरमध्ये आहोत. कुठे राहावे, कुठे फिरावे, कोणत्या वस्तू कुठे विकत घ्याव्यात.

हाऊसबोट हा ऑप्शन सध्या तरी नको असे ठरवले आहे. परंतु किनार्‍यावरचे छोटेसे हॉटेल ज्याच्या रूम्सना लेक व्ह्यु असेल असे चालेल.

आम्ही विमानतळावरून जाणार आहोत त्यामुळे विमानतळ ते शहर प्रवास कसा केला जावा?

शहरात गेल्यावर फिरून हॉटेल शोधायचा एक ऑप्शन आहेच. पण तरीही तुम्ही अनुभवलेल्या हॉटेल बद्दल माहिती दिल्यास इथून बोलणे करून जाता येईल ज्यामुळे विमानतळावरून पिकपचा ऑप्शन मिळू शकेल,

विषय: 
शब्दखुणा: 

Visiting Ladakh - 1

Submitted by इंद्रधनुष्य on 19 August, 2013 - 11:56

खुप वर्षां पासून मनी बाळगलेला एखादा मनसुबा जेव्हा कधी तडीस जातो.. तेव्हा मिळणारा आनंद शब्दात उतरवणे फार कठीण काम असते. जेव्हा केव्हा हिमालयीन ट्रेकिंगचा विषय निघायचा तेव्हा उसासे टाकण्या खेरीज मला काहिच करता येत नसे. अश्यातच एके दिवशी मायबोलीवर जिप्सी सारखा भटक्या भेटतो काय आणि हिमालयाच्याही पार... थेट लेह-लडाखची सफर घडते काय.. सगळच स्वप्नवत!

Subscribe to RSS - श्रीनगर