हसू पसरलं घरभर....

हसू पसरलं घरभर....

Submitted by पुरंदरे शशांक on 5 March, 2013 - 10:45

हसू पसरलं घरभर....

चिमणी आमची शाणी
गोड गाते गाणी
एकदा अश्शी रुसली
कोपर्‍यात जाऊन बसली

"अगं अगं चिम्णे, लवकर येना इकडे
खाऊ किती आणलाय हात कर जरा पुढे"

"खेळ किती आणलाय बाबांनी भारी
चला चला लवकर खेळायला तरी"

आई आली बाहेरुन
हाक मारी चिम्णू म्हणून

चिम्णू काही ऐकेना
बोलेना की उठेना

"एक फुगा फुगलाय
कोपर्‍यात जाऊन बसलाय
खाऊ काही खात नाही
खेळ पण खेळत नाही"

आई आली जवळ नि हात ठेवी डोक्यावर
रडत रडत सोनू हसते, उडी घेई कडेवर
....अस्सा फुगा फुटताच हसू पसरलं घरभर....

Subscribe to RSS - हसू पसरलं घरभर....