ज्योतिष संशोधन

ज्योतिष

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 5 January, 2015 - 12:42

नमस्कार,

१९ जुलै २०१४ पासून गुरु ग्रह कर्क या गुरुच्या उच्चराशीत आहे. उच्चराशीतील गुरुग्रह हा यश किर्ती , सुख समाधान व बुद्धिमत्ता प्रदान करतो असा उल्लेख ज्योतिषविषयक ग्रंथात मिळतो. या नियमाचा संशोधनात्मक अभ्यास करण्याची गरज आहे, त्यासाठि कर्क राशीत गुरु असणा-या पत्रिका संग्रहात असणे नितांत गरजेचे आहे. ज्योतिषातील ग्रहयोगांचा संशोधनपर अभ्यास करण्यासाठि १९ जुलै २०१४ ते ३१-१२-२०१४ या काळात जन्म झालेल्या बाळांची पत्रिका विनामुल्य करुन देण्यात येईल.
बाळाचे नाव -
जन्मतारीख -
जन्मवेळ -
जन्मस्थान -
जन्मपत्रिकेची pdf file इमेल द्वारे पाठवण्यात येईल.
संपर्क - panshikar999@gmail.com

विषय: 
शब्दखुणा: 

या ज्योतिषाच काय करायच?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 10 March, 2013 - 01:42

सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ज्योतिष संशोधन