टाळ्या

हशा, टाळ्या आणि 'पारले-जी' चॉकलेट

Submitted by चिर्कुट on 19 December, 2012 - 12:05

माबोवरचं माझं हे पहिलंच लिखाण. जुनाच एक लेख टाकून सुरुवात करतो. Happy

साधारणपणे ऑगस्ट एन्डचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस.

'कुमार विद्यामंदीर,हुपरी-शाळा नं. 1' मधील तिसरी-ब चा वर्ग. मुलांना "प्रश्नोत्तरे लिहा रे", असं सांगून अलाटकर गुरुजी निवांत पान खात बसले होते. त्याच वर्गात एका कोप-यात अस्मादिक मित्रांबरोबर 'चिंचोके' खेळण्यात गुंतले होते.

Subscribe to RSS - टाळ्या