वसंत बापट

"मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - वसंत बापट - भरत.

Submitted by भरत. on 2 March, 2022 - 02:49

मी कॉलेजात होतो , तेव्हा पॉकेट मनीची पद्धत फार नव्हती. अडल्यानडल्याला म्हणून थोडे पैसे दिलेले असत. पार्ल्यात जानेवारी महिन्यात मॅजेस्टिक गप्पा असत आणि त्याला जोडून त्यांचं पुस्तकप्रदर्शनही असे. जवाहर बुक डेपोवालेही त्याच्या मागे पुढेच पुस्तकप्रदर्शन लावीत. अशाच एका पुस्तकप्रदर्शनात दुपारी मंडपात कोणीही चिटपाखरू नसताना भरपूर वेळ पुस्तकं चाळत , त्यातल्या त्यात कमी किंमतीची आवडलेली पुस्तकं विकत घेतली. त्यात वसंत बापटांची मानसी (किंमत पाच रुपये) प्रवासाच्या कविता ( किंमत सोळा रुपये) सकीना (किंमत बारा रुपये) ही पुस्तके घेतली. इंदिरा - मृगजळ आणि कुसुमाग्रज - वादळवेल हीदेखील.

वसंत बापट यांची एक कविता हवी आहे

Submitted by _प्राची_ on 11 December, 2012 - 00:07

वसंत बापटांची एक कविता आहे. लग्नाला पन्नास वर्षे झालेल्या जोडप्यावर. ती विचारते की मी त्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसले होते ? तो उत्तर देतो पण ती प्रत्येक उत्तर खोडून काढते. असे अनेक प्रश्न ती विचारते. शेवट छान होता. तो म्हणतो इतकं पक्कं की त्यादिवशी रात्र लवकर सरली होती. शब्द नीट आठवत नाहीयेत. कोणाला पूर्ण कविता माहीत असेल तर टाकल का प्लीज ?
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वसंत बापट