आपली जीवनशैली किती आरोग्यदायी आहे? एक स्वयंमूल्यमापन चाचणी
हल्ली रस्त्यावर फिरताना एक गोष्ट वारंवार जाणवते. अनेक महागड्या बाईक्स दिसतात. चमकदार रंग, रुबाबदार डिझाइन, भरदार इंजिन. पण त्या बाईककडे पाहण्यापेक्षा त्यावर बसलेल्या माणसाकडे पाहिलं की वेगळंच चित्र दिसतं.
नवीन बाईकवरचा स्वार अनेकदा सुडौल दिसतो. पण बऱ्याचदा काही वर्षे जुनी झाल्यानंतर त्या बाईकवर पोट सुटलेले बेडौल स्वार दिसतात. यात तरुण, मध्यमवयीन, स्त्रिया, पुरुष असा कोणताही अपवाद नाही. एका बुलेटवरचा तरुण इतका स्थूल होता की बुलेटसुद्धा लूना सारखी केविलवाणी वाटत होती.