लंडन ऑलिम्पिक्स २०१२ जिम्नॅस्टीक्स

जिम्नॅस्टीक्स

Submitted by मंजूडी on 28 July, 2012 - 07:51

नेत्रसुखद आणि चित्तवेधक असा जिम्नॅस्टिक्स हा खेळ ऑलिंपिक्समधे तीन प्रकारात खेळला जातो - आर्टीस्टीक जिम्नॅस्टीक्स, रीदमिक अर्थात् तालबद्ध जिम्नॅस्टीक्स आणि ट्रॅम्पोलिन.

१. आर्टीस्टीक जिम्नॅस्टिक्स

- ऑलिंपिकमध्ये आर्टीस्टीक जिम्नॅस्टीक्स या खेळाचा अंतर्भाव सर्वप्रथम १९२४ साली केला गेला. यामध्ये पुरुषांसाठी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा खेळवल्या गेल्या.

- त्याच्या पुढच्याच ऑलिंपिकमध्ये म्हणजे १९२८ साली महिलांसाठीही जिम्नॅस्टीक्सच्या सांघिक स्पर्धा खेळवल्या गेल्या, परंतु महिलांना आपल्या वैयक्तिक कामगिरीसाठी पदक जिंकण्याच्या संधीसाठी १९५२ साल उजाडावे लागले.

Subscribe to RSS - लंडन ऑलिम्पिक्स २०१२ जिम्नॅस्टीक्स