श्री गणेशाय नमः

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

रंगीबेरंगी चे पान मिळून खरे तर एक वर्ष होउन गेले पण त्यात कसे रंग भरावे कळत नव्हते आणि अजूनही कळत नाहीये. Sad

विडंबने इकडे टाकली तर गुलमोहर सोडून लोक इकडे येउन वाचतील ह्याची खात्री नाही ... मग काय लिहावे बरे?

शेवटी ठरवले... की आता निदान श्रीगणेशा तरी करुयात...

म्हणून मग गणपती बाप्पाचे स्मरण करतो...


श्री गणेशाय नमः

प्रारंभी विनती करू गणपती
विद्यादया सागरा |
अज्ञानत्व हरोनी बुद्धि मति दे
आराध्य मोरेश्वरा |
चिंता, क्लेश, दरिद्र, दु:ख अवघे
देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा
भक्तां बहु तोषवी ||

ganapati

विषय: 
प्रकार: 

टवटवीत फुलांनी नटलेल्या बाप्पांना पाहुन सकाळ प्रसन्न झाली!
तुमची विडंबने रंगबिरंगीत असो वा गुलमोहोरात की आणि कुठे.. आपण तर वाचतो बॉ Happy आता येउ द्या दणक्यात..

मिल्या,
तुझ्या ब्लॉगवर तु लिहीलेले बालगीत वाचले, छान आहे, आवडले. त्याला चाल लावुन ते रेकॉर्ड करण्याचा विचार केला आहेस का?
शक्य असेल तर नक्की कर.
तु केलेली विडंबणे मस्तच असतात ह्यात काही वादच नाही.

अहो मिल्या दादा.

टाका विडम्बन इकडे. लोक नक्की वाचतील. अगदी नक्की.

धन्यवाद चिनु, रुनि, केदार...

रुनी : एका संगितकार मायबोलीकराने चाल लावायचे प्रॉमिस केले आहे.. बघुया त्यांना कधी वेळ होतोय ते...

असाच लोभ असू द्यावा....

http://milindchhatre.blogspot.com

मिलिंद, तु विडंबने कुठेही टाक. आम्ही वाचणारच...

धन्यवाद प्राची Happy

पण अनुभव असा की लोक जितके सहजतेने गुलमोहर वर जाउन वाचतात तितके रंगिबेरंगिवर फिरकत नाहीत Sad ... त्यात मी
पण आलो Happy

visit http://milindchhatre.blogspot.com