श्री गणेशाय नमः
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
6
रंगीबेरंगी चे पान मिळून खरे तर एक वर्ष होउन गेले पण त्यात कसे रंग भरावे कळत नव्हते आणि अजूनही कळत नाहीये.
विडंबने इकडे टाकली तर गुलमोहर सोडून लोक इकडे येउन वाचतील ह्याची खात्री नाही ... मग काय लिहावे बरे?
शेवटी ठरवले... की आता निदान श्रीगणेशा तरी करुयात...
म्हणून मग गणपती बाप्पाचे स्मरण करतो...
श्री गणेशाय नमः
प्रारंभी विनती करू गणपती
विद्यादया सागरा |
अज्ञानत्व हरोनी बुद्धि मति दे
आराध्य मोरेश्वरा |
चिंता, क्लेश, दरिद्र, दु:ख अवघे
देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा
भक्तां बहु तोषवी ||
विषय:
प्रकार:
शेअर करा
वा!
टवटवीत फुलांनी नटलेल्या बाप्पांना पाहुन सकाळ प्रसन्न झाली!
तुमची विडंबने रंगबिरंगीत असो वा गुलमोहोरात की आणि कुठे.. आपण तर वाचतो बॉ आता येउ द्या दणक्यात..
बालगीत आवडले
मिल्या,
तुझ्या ब्लॉगवर तु लिहीलेले बालगीत वाचले, छान आहे, आवडले. त्याला चाल लावुन ते रेकॉर्ड करण्याचा विचार केला आहेस का?
शक्य असेल तर नक्की कर.
तु केलेली विडंबणे मस्तच असतात ह्यात काही वादच नाही.
लीहा लीहा
अहो मिल्या दादा.
टाका विडम्बन इकडे. लोक नक्की वाचतील. अगदी नक्की.
धन्यवाद
धन्यवाद चिनु, रुनि, केदार...
रुनी : एका संगितकार मायबोलीकराने चाल लावायचे प्रॉमिस केले आहे.. बघुया त्यांना कधी वेळ होतोय ते...
असाच लोभ असू द्यावा....
http://milindchhatre.blogspot.com
मिलिंद, तु
मिलिंद, तु विडंबने कुठेही टाक. आम्ही वाचणारच...
धन्यवाद
धन्यवाद प्राची
पण अनुभव असा की लोक जितके सहजतेने गुलमोहर वर जाउन वाचतात तितके रंगिबेरंगिवर फिरकत नाहीत ... त्यात मी
पण आलो
visit http://milindchhatre.blogspot.com