बागराज्यात नाट्यसम्मेलनाची घोषणा
All the Natya rasiks of the world,
Namaskar.
PLEASE SAVE THE DATES
29Th & 30Th May, 2010 in Raritan Center, NJ, USA.
for the historic event of 1st Vishwa Marathi Natya Sammelan
( this will be the 90Th Natyasammelan )
*Marathi Manoos has an insatiable thirst for Good Marathi nataks.
*To quench this inherent urge, we promise to bring you
the Best Marathi Plays from the world,
which will fully satisfy the taste of the US audience.
Sincerely yours,
Shri Mohan Joshi ( President – Akhil Bharatiya Marathi Natya Parishad )
Dr. Meena Nerurkar (President- Marathi Natya Parishad, US chapter)
* Manish Ingle * Nitin Limaye * Sanjay Shetye * Meena Deshpande
The details and the list of teams and team members to follow:
This historic Marathi Cultural event is supported by
Marathi Vishwa, NJ
Maharashtra Mandal, NY
Marathi Mandal, Philadelphia
यासाठीच
यासाठीच दोन्ही कडच्यांना अतिरेकी म्हटलेच होते... झक्की अतिरेकी बोलून लोकाना भडकवण्यासाठीच येतात तेव्हा त्यांचे बोलणे मनावर घ्यायचे नाही हे मी मायबोलीवर आलो तेव्हाच शिकलो . त्यामुळे त्यांच्या पोस्टींकडे लक्ष देत नाही मी....:D
तुझा विरोध अस्थानी आहे, कारण तुझा राग 'महाराष्ट्र सरकारने' पैसे देण्यावर आहे, नाट्यपरिषदेवर आहे, होणार्या कार्यक्रमाला नाट्यसम्मेलन म्हणण्याला आहे. त्याचा या संस्थेशी सरळ संबंध येत नाही.
'व्हिसा' हा पुन्हा दुसराच प्रश्न आहे. जो न भारत सरकार न अमेरिकेतली मराठी माणसं सोडवू शकणार.
नाट्यपरिषदेने उद्या सांगितलं की आपण यांना 'अमेरिकेत होणारे मराठी नाट्यप्रयोग' असं म्हणुया तर तसं करता येईल. मुळात तुम्हाला निवडून आलेली कार्यकारणी आणि तिची धोरणं पसंत नसतील तर त्याना तुम्ही बरखास्त करून दुसरे निवडा. पण जोपर्यंत ते अधिकॄत आहेत तोपर्यंत तुमचा विरोध त्याना असायला हवा...
झक्किंच्या भाषेत न शिरता: मला नाटक बघायला आवडतं. मी पैसे देऊन नाटक बघतो. आवडलं तर चार लोकांना सांगतो. नाही आवडलं तर झोपतो, उठून जातो, आणि चार लोकाना सांगतो. बाकी मला चर्चा, दिशा, बौध्दिक, वैचारिक वगैरे काही समजत आणि झेपत नाही. तेव्हा चार नाटकं बघायला मिळाली की मी खुष. बाकी तुम्ही त्याना सम्मेलन म्हणा नाहीतर 'धयकाला'....
विनय
>>तुझा
>>तुझा विरोध अस्थानी आहे, कारण तुझा राग 'महाराष्ट्र सरकारने' पैसे देण्यावर आहे, नाट्यपरिषदेवर आहे, होणार्या कार्यक्रमाला नाट्यसम्मेलन म्हणण्याला आहे. त्याचा या संस्थेशी सरळ संबंध येत नाही.<<
अजिबात अस्थानी विरोध नाही. नाट्यसंमेलन हा शब्द ही पण संस्था वापरतेच की. आणि नाट्यसंमेलनाचे होस्ट म्हणून मिरवणारच आहे ही संस्था. जे खरंतर चार व्यावसायिक नाटकांचे प्रयोग आहेत. बाकी काहीही नाही.
>>'व्हिसा' हा पुन्हा दुसराच प्रश्न आहे. जो न भारत सरकार न अमेरिकेतली मराठी माणसं सोडवू शकणार. <<
हे कळत असतानाही त्या इव्हेंटला नाट्यसंमेलन म्हणायचं हा अट्टाहास का? अमेरीकेत मराठी नाटकांचे प्रयोग एवढंच म्हणून जमत नाहीये ना तुम्हाला?
>>नाट्यपरिषदेने उद्या सांगितलं की आपण यांना 'अमेरिकेत होणारे मराठी नाट्यप्रयोग' असं म्हणुया तर तसं करता येईल. <<
अमेरीकेत नाट्यसंमेलन करण्याचा निर्णय कुणाचा आहे? केवळ नाट्यपरीषदेचा? त्यांनी काय या संस्थेच्या पदाधिकार्यांना सक्ती केली आहे नाट्यसंमेलन भरवा अशी? त्या संस्थेतील लोकांना हा विचार करता येत नाही? की वेळ आली की खापर नाट्यपरीषदेवर, मिरवताना आम्ही पुढे असं धोरण आहे या संस्थेचं?
>>मुळात तुम्हाला निवडून आलेली कार्यकारणी आणि तिची धोरणं पसंत नसतील तर त्याना तुम्ही बरखास्त करून दुसरे निवडा. पण जोपर्यंत ते अधिकॄत आहेत तोपर्यंत तुमचा विरोध त्याना असायला हवा...<<
भारतात केवळ राजकीय निवडणुका सार्वजनिक असतात. या निवडणुका अंतर्गत असतात. निदान हे तरी माहीत असेलच. सामान्य प्रेक्षकाला म्हणून नाट्यपरीषदेच्या निवडीचा अधिकार नसतो इतपत आठवत असेलच भारतातलं तुम्हाला. आणि प्लीज तुम्ही नका सांगू मला मी कोणाला विरोध करायचा ते.
भारतातली संस्था, पैसे फेकल्यावर येणारे फालतू भारतीय कलाकार हे सगळे जेवढे दोषी आहेत तेवढीच ही संस्थाही आहे. तुम्हाला विरोध दर्शवलेला सहन होत नाहीये बहुतेक.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
>>बाकी मला
>>बाकी मला चर्चा, दिशा, बौध्दिक, वैचारिक वगैरे काही समजत आणि झेपत नाही. तेव्हा चार नाटकं बघायला मिळाली की मी खुष. बाकी तुम्ही त्याना सम्मेलन म्हणा नाहीतर 'धयकाला'....<<
हाच तर घोळ आहे ना. नाटकं बघायला मिळण्यापलिकडे नाटकाच्या जगाबद्दल कणभरही आस्था ज्यांना नाही अश्या लोकांची संस्था होस्ट म्हणून मिरवणार. आणि आपल्या मराठी संस्कृतीच्या प्रेमाचं दर्शन घडवणार.
नाटक एक कला म्हणून मरेना का यांचं काय जातंय..
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
तुम्हाला
तुम्हाला विरोध दर्शवलेला सहन होत नाहीये बहुतेक. << असेच असावे, नाहीतर तुम्हाला समजवायला का धजेन मी...
आता मी जेव्हा नाटकांचे प्रयोग लावेन तेव्हा 'नाटकाचा फड' असे नांव देईन. सद्य संस्थेत मी नसल्यामुळे हे मला करता येत नाहीय... पण त्यांची जाहीरात आनंदाच्या भरात इथे लावली गेली (म्हणजे मी लावली)
पैसे फेकल्यावर येणारे फालतू भारतीय कलाकार हे सगळे जेवढे दोषी आहेत <<<< अरे व्वा अगदी झक्कींची भाषा.. ते हेच म्हणाले होते...:(
'नाट्यसंमेलन हा शब्द'.. Copyright झाल्याचं मला माहीत नव्हतं..
ज्या लोकांना अमेरिकन सरकारने व्हिसा नाकारला त्यांची माफी मागतो.
ज्या कलाकाराना बोलावले गेले नाही त्यांची ही माफी मागतो.
नाट्यपरिषदची निवडणूक नसते हे माहीत मला नसल्यामुळे ज्यांची मने दुखावली त्यांची ही माफी...
वरील जाहीरात ही फक्त 'आपल्याला मराठी नाट्यप्रयोग बघायला मिळणार आहेत' अशी वाचावी. त्याबद्दल गैरसमज झाला असेल तर मी जाहीर माफी मागतो.
तुमचा समज 'गैरसमज' वाटला याबद्दलही माफी....
विनय
काय हे
काय हे विनय, ईतक्यातच पांढरा झेंडा ..
ठिके..
ठिके.. मुद्दा समजून घ्यायचा नाहीच असं ठरवलंय तर... whatever!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
मुद्दा
मुद्दा असेलच कुठेतरी. सापडला की समजून घेऊच.... तोपर्यंत विरोधाभासात चाचपडतोय हो मी....
चुकून आनंद झाला नाटक बघायला मिळेल म्हणून.. तर 'मी त्याना व्हिसा दिल्या नसल्याचे' लक्षात आले.
मी पैसे भरून नाट्यपरिषदेचा मेंबर झालो, पण तसे केले तरी नाट्यस..लन हा शब्द वापरण्याची लायकी नाही हे लक्षात आले. बाकी ही नाट्यपरीषद पैसे घेताना तुम्हाला नाट्य..लन' असा शब्द वापरण्यासाठी विशेष परवानगी लागेल असं म्हणाली नाही.
पैसे फेकल्यावर येणारे फालतू कलाकार.. की व्यावसायिक कलाकार व्यवसाय म्हणून पैसे घेतात.. यातलाही मुद्दा अजून समजला नाही. समजला की सांगेन.
सशल, अगं मी नाटकाचा प्रेमी आहे... 'आपल्याला नाटक करता येते ना...मग चर्चा कशाला करायच्या...' असे एक पु. ल. दे....डे नावाचे लेखक म्हणाले होते. तेव्हा पांढरा काय हिरवा, पिवळा कुठलाही झेंडा...
विनय
>>
>> 'नाट्यसंमेलन हा शब्द'.. Copyright झाल्याचं मला माहीत नव्हतं..
विनय, हरकत त्या शब्दाला आहे असं नाही. पण हे पत्रक नाट्यपरिषदेकडून (हे ९०वं नाट्यसंमेलन आहे अशा माहितीसकट) निघतं तेव्हा त्याला निराळा अर्थ येतो. आणि जबाबदारीही. त्या जबाबदारीची जाणीव कोणत्याच संबंधित संस्थेला वा शासनाला असल्याचं दिसत नाही हे दु:ख आहे. खरोखरच स्वच्छ 'फड' म्हणून लावली असती नाटकं तर बहुधा हा वादाचा विषय झाला नसता.
आपल्याला वैचारिक वगैरे झेपत नाही हे खरं, पण नाटकासाठी पोटतिडिकीने आणि लष्करच्या भाकर्या भाजत जे लोक काम करतात, त्यांना परिषदेच्या पाठबळाची जास्त गरज नाही का? आणि परिषदेच्या उद्दिष्टांसाठीही अशांना पाठबळ देणं महत्त्वाचं नाही का?
करणारे (हव्या त्या नावाखाली) हवं ते करणारच आहेत. पण निदान या चर्चेच्या निमित्ताने प्रायोगिक रंगकर्मींचे प्रश्न ऐरणीवर आले ही चांगलीच गोष्ट आहे.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
विनय..
विनय..
<<अजिबात
<<अजिबात अस्थानी विरोध नाही. नाट्यसंमेलन हा शब्द ही पण संस्था वापरतेच की. आणि नाट्यसंमेलनाचे होस्ट म्हणून मिरवणारच आहे ही संस्था. जे खरंतर चार व्यावसायिक नाटकांचे प्रयोग आहेत. बाकी काहीही नाही. >>
शभर टक्के अनुमोदन. मी हे म्हंटलेहि होते. आता इथले लोक त्याला नाट्यसंमेलन म्हणतात, पण तिकडचे लोक सांगू शकत नाहीत का की अहो, तुम्हाला काय कळते? नाट्यसंमेलन असे नसते, आम्ही व्यावसायिक लोक गेली अनेक वर्षे कष्ट करतो, प्रयोग करतो, चर्चा करतो, अनेक नाटके करतो म्हणून चांगले नाटक करू शकतो. तुम्ही आमच्या येण्याला 'नाट्यसंमेलन' वगैरे भारदस्त नावे देऊ नका. आम्ही जरी व्यावसायिक असल्याने पैसे दिले की येतो, तरी आम्हालाहि काही तत्वे, मूल्ये आहेत. तुमच्या या अश्या चुकीच्या प्रसिद्धी मुळे आमच्या खर्या नाट्यप्रेमी लोकांची खिल्ली उडवली जात आहे. तुम्ही ते थांबवले नाहीत तर निषेध म्हणून आम्ही येणार नाही. आम्हाला अपमान करून घेऊन तुमचे पैसे नकोत, आम्ही आहोत तिथे सुखी आहोत, वाटले तर स्वतःच्या पैशाने येऊन अमेरिका बघू (आहे काय दगड, धोंडे तिथे. त्यापेक्षा युऱोप कितीतरी सुंदर!). तर हे थांबवा, मग बोला!!
असे ते म्हणू शकतात, केंव्हाहि! पण म्हणत नाहीत! येतात आपले! "तुम्ही का बोलावले? तुम्ही म्हणला नाट्यसंमेलन, आम्ही नाही!!" असली चालूगिरी. ठाम भूमिका घ्या की आधी तुम्ही नाट्यसंमेलन म्हणायचे थांबवा, मग विचार करू.
उगीच आपले मायबोलीवरच्या लोकांशी कचाकचा भांडायचे! मला एक उद्योग नाही, तुम्हाला आहेत ना? मग तरी तुमची ही भांडाभांडीची "insatiable thirst" घेऊन इथे येण्या ऐवजी जे अमेरिकेला येऊ घातले आहेत्, त्यांच्याशी भांडा!
<<अमेरीकेत नाट्यसंमेलन करण्याचा निर्णय कुणाचा आहे? केवळ नाट्यपरीषदेचा? त्यांनी काय या संस्थेच्या पदाधिकार्यांना सक्ती केली आहे नाट्यसंमेलन भरवा अशी? त्या संस्थेतील लोकांना हा विचार करता येत नाही? की वेळ आली की खापर नाट्यपरीषदेवर, मिरवताना आम्ही पुढे असं धोरण आहे या संस्थेचं?>>
शेवटच्या प्रश्नाचे उत्तर 'हो'. बाकीच्यांची 'नाही.' इथे खापर फोडण्याचा संबंधच नाही. आमच्या मते आम्ही त्याला नाट्यसंमेलन म्हंटले. लोकांना बोलावले. आता जर त्यांनी याला नाट्यसंमेलन म्हणण्याबद्दल आक्षेप घेतला नाही तर आम्ही त्याला म्हणत राहू!! जर भारतातले कुणि म्हणले आम्ही याला मान्यता देत नाही, पैसे देत नाही, तरी हे होणारच, कारण व्यावसायिकतेत ज्यांचा फक्त पैशाशी संबंध असतो, इतर गोष्टींशी नाही, असे लोक येतीलच!! ! चिकार पैसा आहे इथल्या लोकांकडे नि तिथल्याहि लोकांकडे. त्याच्या जोरावर ते कशालाहि काहीहि म्हणून धम्म्माल करतीलच!! ते परिषद वगैरे इतर लोक बघतील.
टीपः आम्ही आमचे पैसे देऊन जे करतो, त्याला आम्ही 'नाट्यसंमेलन,' 'विश्व नाट्यसंमेलन,' 'न भूतो न भविष्यति असे नाट्यसंमेलन,' ' नाटकांचे पहिले विश्व महायुद्ध' अशी नावे देऊ. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर निषेध म्हणून येऊ नका. एव्हढी काय खरी पैशाची गरज नाहीये तुम्हा लोकांना. स्वाभिमान आहे ना!! तिकडच्या लोकांना सांगा, बोलावले असले तरी निषेध म्हणून इकडे येऊ नका, त्यांच्याशी भांडा.
खरे तर तुमच्या एव्हढे तत्वनिष्ठ, कलेशी प्रामाणिक इ. चांगले गुण असलेले लोक अमेरिकेत फार थोडे केवळ धम्माल करणारे खूप! तेंव्हा ते काय करतात तिकडे लक्ष न देता आपण आपले काम चालू ठेवावे.
स्वाती हे
स्वाती हे मला मान्य... नाट्यसम्मेलन म्हणणे फक्त काही व्यावसायिक नाटकवाले असं बरोबर नाही.
पण म्हणून तिकीट विकत घेऊन नाटक बघायला येणार्या प्रेक्षकाला जबाबदार धरणे बरोबर नाही.
शेवटी तो एकच असा आहे जो नाटक चालवतो. रिकाम्या थेटरात नाटकं करून पोटं भरत नाहीत आणि कलाही होत नाही.
तेव्हा 'तो' जर पैसे भरून काहीतरी करत असेल, तर त्यालाच बडवण्यापेक्षा त्याचा उपयोग करून घेणं हितवाह नाही का? की आमची भांडणे आहेत तेव्हा तुम्ही आधी ती सोडवा, नाहीतर नाव पण घेऊ नका हे धोरण काय उपयोगाचे?
विनय
पण म्हणून
पण म्हणून तिकीट विकत घेऊन नाटक बघायला येणार्या प्रेक्षकाला जबाबदार धरणे बरोबर नाही.<<
तेव्हा 'तो' जर पैसे भरून काहीतरी करत असेल, तर त्यालाच बडवण्यापेक्षा त्याचा उपयोग करून घेणं हितवाह नाही का? <<
काहीही. प्रेक्षकाला कोणी जबाबदार धरलं होतं? की कोण त्याला बडवत बसलं होतं? उगाच काहीतरी बोलू नका.
आमची भांडणे आहेत तेव्हा तुम्ही आधी ती सोडवा, नाहीतर नाव पण घेऊ नका हे धोरण काय उपयोगाचे?<<
फुकटची बोंब यालाच म्हणतात बहुतेक.
अमेरीकेतल्या संस्थेच्या हेतूविषयी शंका घेतल्याने झालेला पोटशूळ सरळच दिसतोय. भारतातल्या मराठी नाट्यजगातल्या यच्चयावत प्रत्येकाला मूर्ख म्हणण्याची खुमखुमी भागवलेली दिसतेय. वर आम्ही झापडंच लावून घेणार आणि तेच बरोबर मानलं पाहीजे सगळ्यांनी विशेषत: भारतातल्या लोकांनी असा हट्टही दिसतो.
ठिके फारच समाजोपयोगी काम करतेय हं तुमची संस्था. संस्कृती टिकवण्याचं काम करतायत. फारच ग्रेट आहे ही संस्था. नाट्यसंमेलन इत्यादी बद्दल चाड असणारे प्रायोगिकवाले दळीद्री लोक त्यांना काय किंमत द्यायची नाही का? तुम्ही करताय तेच बरोबर आहे हं!... खुश? झालं समाधान?
बापरे.. इथे
बापरे.. इथे नाटकांचे प्रयोग होतायत हे इतक्या गदारोळाचे कारण असू शकते ??
मला खूप आनंद झालेला ही जाहीरात वाचून की अमेरिकेमधेही आता नाटकं बघता येतील वगैरे.. ( भले मी तिथे जाऊ नाही शकणार, पण जाता येईल हा आनंद.. !)
तो सगळा विरला.. मला इतक्या वादाचे कारणच कळत नाहीय? जर परिषदेशी वगैरे वाद असतील तर ते इथे कशाला ? प्रायोगिक की व्यावसायिक हा मुद्दाही काहीही.. सुरवात होतीय काही चांगल्या गोष्टींची , नाटकं पाहता येतील, इतकंच मला वाटलं.. अमेरिकेमधे प्रयोग करायचे तर नक्कीच भारतापेक्षा जास्त पैसे किंवा व्हॅलिड व्हीजा लागतो हे असणारच ना? आत्ता व्यावसायिक नाटकं येतायत, काही वर्षांनी प्रायोगिकही येतील.. त्यात नक्की प्रॉब्लेम काय आहे कळलं नाही बुआ?
www.bhagyashree.co.cc/
विनय, ह्या
विनय, ह्या संपूर्ण सिस्टिम मध्ये बदल आणायचा तर कुठून तरी सुरूवात करणं आवश्यक आहे ना .. मला असं वाटतंय मायबोलीच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत ही तळमळ, कळकळ पोचवता येईल त्यांच्यापर्यंत ती पोचवण्याचा प्रयत्न चालू आहे .. तुम्हीच म्हणालात तसं प्रेक्षक हा ह्यातला महत्वाचा घटक आहे तेव्हा तुमच्यासारख्या प्रेक्षकांतर्फे ही जाणीव, कळकळ अजून वरच्या स्तरावरच्या आणि ज्यांच्यात बदल घडवण्याची "पॉवर" आहे अश्यांपर्यंत पोचली तर ते चांगलंच ह्या उद्देशाने इथेच विरोध दर्शवला जात असेल ..
<<पण निदान
<<पण निदान या चर्चेच्या निमित्ताने प्रायोगिक रंगकर्मींचे प्रश्न ऐरणीवर आले ही चांगलीच गोष्ट आहे.>>
नुसतेच आले नाहीत, तर घणाचे घाव पडून ठिणग्या उडताहेत बघा! तिकडे भारतातून पहाटे २ वा. ४२ मिनिटांनी नुकतेच घणाचे घाव पडले बघा.
असे का म्हणत नाही कुणी की 'याला नाट्यसंमेलन म्हणू नका' असे स्पष्ट पत्र नाट्यपरिषदेच्या अध्यक्षांनी तातडीने मीना नेरूरकर यांना पाठवावे! मला वाटते, इथल्या सगळ्यांना ते मान्य आहे.
त्यासाठी सह्या गोळा करण्याचा उपक्रम सुरु करावा, विशेषतः जे नाट्यपरिषदेचे सभासद आहेत त्यांच्या. इतरहि कुणि सह्या केल्या तर बरेच. या उप्पर जर जर परिषदवाले स्वस्थ बसतील, नि अमेरिकेत येऊन मजा करतील, तर नाट्य परिषदेच्या सभासदांचे दुर्भाग्य.
<<त्यात नक्की प्रॉब्लेम काय आहे कळलं नाही बुआ? >>
प्रॉब्लेम कसला. काहीतरी घ्यायचे नि धमाल भांडाभांडी, वादविवाद करायचे! लई मज्जा.
पैसे
पैसे फेकल्यावर येणारे फालतू भारतीय कलाकार <<<< हे मी लिहीले का हो? की पहाटेच्या स्वप्नात आहात?
अमेरीकेतल्या संस्थेच्या हेतूविषयी शंका घेतल्याने <<< तो आम्ही आधीच मान्य केला हो..
(आम्हाला नाटके बघून मज्जा करायची आहे.. त्याला तुम्ही 'नाटकाचा फड' म्हणा....)
भारतातल्या मराठी नाट्यजगातल्या यच्चयावत प्रत्येकाला मूर्ख म्हणण्याची खुमखुमी भागवलेली दिसतेय. <<<< हे ही तुमचेच... असं कुठेही म्हटलेले नाहीय...
पैसे देऊन येणार प्रेक्षक म्हणजे मी आणि माझ्या सारखे.. खरंच तिकीट काढून बघतो मी नाटकं. त्यांना का बडवताय तुम्ही? असा प्रश्न.. पण याला 'बडवणे' असं म्हणत नसावेत...
त्याबद्दल मी सॉरी आहे..
एकीकडे तुम्हाला पुळका आहे कलाकारांचा... दुसरीकडे ते 'फालतू....' आहेत असंही म्हणता..
बाकी समाजोपयोगी, संस्कॄती टिकवणे वगैरे पण तुमचाच भ्रम.....
BSK , त्यांचे भांडण नक्की कुणाशी आहे ते कुणालाही कळलेलं नाही, पण या सगळ्याला जबाबदार अमेरिकेतली संस्था म्हणजे 'अखिल भारतीय मराठी नाट्यपरीषद' आहे म्हणे.
विनय
तेव्हा आता Seriously...
तुमची नक्की काय अपेक्षा आहे?
म्हणजे इथे असलेल्या नाट्यपरिषदेचा सभासदानी आणि तिकीट विकत घेऊन येणार्या प्रेक्षकानी काय काय करावे? (निषेध, बहिष्कार किंवा आणखीन काही).
अ. भा. म. नाट्यपरीषदेला दुसरा काही पर्याय तुम्हाला सुचवता येईल का?
त्यांची Popularity वाढवून प्रेक्षक त्या अ-व्यावसायिक नाटकांकडे वळेल असे काय करता येईल?
व्यावसायिक लोकांच्या मागे प्रेक्षक लागू नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी?
अ-व्यावसायिक नाटकांमधली सध्या उत्तम चाललेली कुठली नाटकं तुम्ही Suggest कराल..
आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो..
विनय
आता ऐरणीचा
आता ऐरणीचा दे॑व पावला का? की अजून काही ठिणग्या हव्या आहेत? मी तयार आहे घण मारायला! असे घण मारतो, की भारतातले सगळे लोक धावून येतील!!

मी भांडण
मी भांडण करायला आले नव्हते. इथे विषय टाकताना तुम्ही केवळ अमेरीकेतल्या लोकांनीच प्रतिसाद टाकावे असं लिहिलं नव्हतं त्यामुळे इथे आले.
हमरीतुमरीवर तुम्ही आलात. मी नाही.
फालतू कलाकार, पैसे फेकणे इत्यादी भाषा झक्कीनी वापरली आणि तुम्ही त्याला दुजोरा दिलात.
माझं पहिलं पोस्ट वाचलं असतं नीट तर तुम्हाला लक्षात आलंही असतं काय म्हणायचं आहे ते.
मी तुम्हाला बडवले इत्यादी तुमचे काय समज असतील ते तुमच्यापाशी ठेवा. कारण मी तसं काहीही केलेलं नाहीये.
तुमच्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही हे समजले. कुठल्याही कृतीची अपेक्षा कधीच नव्हती. ती कधी पुरी होणार नाही याची पूर्ण खात्री आहे. निदान संकल्पना समजून घेण्याइतपत डोळसपणा दाखवाल अशी शंका आली होती.
पण तुम्ही तर नाट्यसंमेलन हा शब्द कॉपीराइटेड आहे का अशी टर उडवत मानसिकता दाखवून दिलीत.
शेवटी परत एकदा संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे तुमची मर्जी.
नाट्यसंमेलन ही गोष्ट नाटकांचे प्रयोग एवढीच मर्यादीत नसते. त्या ठिकाणी मराठी नाटकांच्या जगामधे कुठे काय चालले आहे, काय असायला हवे या सगळ्याचा उहापोह होतो. नाटक ही कला म्हणून कशी कशी आणि कुठे कुठे वाढत जाते आहे याचा परामर्श घेता यावा यासाठी विविध परिसंवाद, चर्चा याबरोबरच घडणारे नवीन प्रयोग हे ही असतात. उल्लेखनीय प्रायोगिक नाटकांचे (उदा: कणकवलीच्या आचरेकर प्रतिष्ठानसाठी अतुल पेठेने दिग्दर्शित केलेला दिवाकरांच्या नाट्यछटांवर आधारीत प्रयोग, मोहीत टाकळकरची काही नाटके, ग्रिप्सची नाटके आणि असे बरेच काही..) प्रयोग हे ही याच विचाराचा भाग असतात, असायला हवेत. नाटकाच्या इतर भागांसंबधाने काही महत्वाचे प्रयोग आणि स्टेटमेंट करणारे प्रयोगही या ठिकाणी पुढे येऊ शकतात.
हे सगळं मिळून जे घडतं त्यालाच नाट्यसंमेलन म्हणता येऊ शकतं.
नाटकांचे प्रयोग यापलिकडे कुठलीच गोष्ट तुमच्या तथाकथित संमेलनात नाही. ती असण्यात तुम्हाला(अमेरीकेतल्या मराठी प्रेक्षकाला) रस नाही हेही तुम्ही स्पष्ट केलेत.
तसेच या बाकीच्या गोष्टींना सामावून घेण्यासाठी लागेल ती ताकद अमेरीकेतील सस्थेकडे नाही. आर्थिक परिस्थिती कितीही बळकट असली तरी इतक्या लोकांना उचलून नेणे इथून हे संस्थेला शक्य नाही. ते चुकून शक्य केले तरी यातल्या आर्थिक दुर्बल कलाकारांना 'व्हिसा' मिळणार नाही हा प्रॉब्लेम कोणालाच न ओलांडता येण्यासारखा आहे. हे माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला कळू शकतं इथे बसून तर मीना नेरूरकरांना कळणार नाही असंही नाही.
तेव्हा जाणीवपूर्वक महत्वाच्या घटकांना डावललं जाऊन जो काय इव्हेंट होतो त्याला नाट्यसंमेलन म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या रंगकर्मींनी स्वीकारावं असं नाट्यपरीषदेने म्हणणं हे चुकीचं आहे.
नाट्यपरीषदेने अमेरीकेतल्या नाट्यरसिकांसाठी काही प्रयोग करावेत तिकडे. US Chapter च्या बळावर. पण त्याला नाट्यसंमेलन म्हणत इथल्यांना नाट्यसंमेलनापासून दूर ठेवावं हे पटण्यासारखं नाही. समांतर प्रवाहाला बाजूला ठेवण्याचं काम नाट्यपरीषद सातत्याने करत आलेली आहे तेच इथे परत होतंय.
मला किंवा समांतर रंगभूमीशी निगडीत असलेल्या कुणालाही चार व्यावसायिक नटांना अमेरीकेत जायला मिळते याबद्दल पोटशूळ नाही. असले आरोप वरती झालेत म्हणून हे सांगावसं वाटलं.
या सगळ्याची जाणीव/ माहीती अमेरीकेतल्या मराठी प्रेक्षकाला असावी, जे काही त्यांच्यासमोर येतंय ते कागदोपत्री नाट्यसंमेलन असलं तरी ते खरोखरीचे नाट्यसंमेलन नव्हे हे निदान माहीत व्हावं या उद्देशाने लिहायला सुरूवात केली होती. चार व्यावसायिक नाटकांच्या आणि कलाकारांच्या पलिकडेही मराठी नाटक इथे घडतंय हे सांगावं असं वाटलं होतं. पण विषय अमेरीकेतले विरूद्ध भारतातले अश्या वाटेला झक्कींनी नेला. विनय यांनी पण तीच री ओढली.
इथे आम्ही कितीही विरोध दर्शवला तरी साहीत्यसंमेलन व्हायचं ते झालंच तसंच या वेळेलाही होणार यात काही शंका नाहीये. तरी योग्य ठिकाणी विरोध नोंदवायचा तो नोंदवूच. पण म्हणून तुमच्या कानावर ही बाजू घालणं हा पण गुन्हा झाल्यासारखं सगळे माझ्या पोस्टसना बडवत सुटले.
नीधपच्या
नीधपच्या पहिल्या पोस्टला अनुमोदन.
>>> आपल्याला वैचारिक वगैरे झेपत नाही हे खरं, पण नाटकासाठी पोटतिडिकीने आणि लष्करच्या भाकर्या भाजत जे लोक काम करतात, त्यांना परिषदेच्या पाठबळाची जास्त गरज नाही का? आणि परिषदेच्या उद्दिष्टांसाठीही अशांना पाठबळ देणं महत्त्वाचं नाही का? <<<
हेही पूर्ण पटले.
विनय, तुम्ही शेवटी विचारलेल्या 'अपेक्षा काय' या प्रश्नाला माझ्या परीने उत्तरे देतो -
संयोजकांना जर वरील मुद्दे पटले असतील तर ते अनुदान नाकारतील का ? म्हणजे सर्व कार्यक्रम त्यांनी स्वबळावर केला असे होईल.
वास्तविकतः हक्काने अनुदान मागून घ्यावे आणि पुढील काही गोष्टी आयोजित कराव्यात -
१. प्रायोगिक/समांतर रंगभूमीवरील प्रयोग, कलाकार यांपैकी काही जणांना तिथे बोलावून घेणे, त्यांचे प्रयोग घडवून आणणे, त्या प्रयोगांवर नंतर कलावंत-प्रेक्षक अशी चर्चा-परिसंवाद घडवणे. तेथील मराठी प्रेक्षकालाही सध्या नवीन काय घडत आहे हे कळले पाहिजे. इथल्या रंगकर्मींनाही नवीन प्रेक्षकजाणीवा कळतील.
२. मराठी रंगभूमीवरील प्रायोगिक, धडपड्या, स्ट्रगलर्स अशा काही कलावंतांना तिथे बोलावून अमेरिकेतील प्रायोगिक रंगभूमीची ओळख करून देणे उदा. ऑफ ब्रॉडवे, ऑफ ऑफ ब्रॉडवे येथील नाटके दाखवणे, त्यातील कलावतांशी यांची गाठ घालून देणे, जेणेकरून त्यांच्यात काही आदानप्रदान होऊ शकेल.
३. अमेरिकेतील रंगभूमीसुद्धा अतिशय समृद्ध आहे. तिथल्या रंगकर्मींची आणि मराठी रंगकर्मींची ओळख होऊन काही चर्चा इ. देवाणघेवाण घडवता येईल. यासाठी हे संमेलन ही एक अतिशय उत्तम संधी आहे. याला आपण विश्व नाट्यसंमेलन म्हणत आहोत तर खरंच वैश्विक आणि संमेलनाचे परिमाण त्याला देण्याचे प्रयत्न करायला हरकत नसावी.
या मार्गांनी मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होण्यास मदत होईल असे वाटते म्हणून हे सुचवले.
***
जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी (- रॉय किणीकर)
अरे
अरे आपल्याला स्वाभिमान नाही का? कोणी आपल्या कलाकारांसाठी, अभिजात कलाक्रुतिंवर पैसे फेकावे आणी
त्यानी परफॉर्म करा वे का? आपल्या भूमी वर आपले संमेलन भरवावे आणी ताठ मानेने आपण ते बघावे.
अमेरिकेतले लोक बघतील ना युटुब वर! नीध प तुम्हाला अनुमोदन. अशी भाषा सहन का करावी. का एवढा अॅरोगन्स?
नीधप,
नीधप, नाट्यसंमेलन ही एक कन्सेप्ट आहे, ज्यात इतकं सगळं करणं अपेक्षित आहे याचा मला तरी पत्ता नव्हता.. ते इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद! आता मला तुझा मुद्दा जरातरी लक्षात येतोय..
www.bhagyashree.co.cc/
कुठल्याही
कुठल्याही संमेलनात आर्थिक निकष असणारच. ते डावलून जगातली कुठलीही आणि कसलीही संमेलनं होत नाहीत. पण नाट्यकलेशी बांधिलकी, चळवळ, तळमळ आणि खरंतर थोडी चाड याखातर संस्थेने प्रायोगिक दालनही ठेवायलाच हवं.
अतुल पेठेंचा तो प्रयोग "आनंदओवरी" का ?तसं असेल तर त्याची डी.वी.डी उपलब्ध आहे.
हे अस्थानी वाटत असेल तर माफ करा, पण आजकाल प्रायोगिक नाटकं पोचवायला इतरही माध्यमं सक्रिय आहेत. नाटक ही जिंवत कला. प्रेक्षागारातच सादर व्हायला पाहिजे वगैरे बरोबर, पण मुळात प्रायोगिक नाटकांना प्रेक्षक लाभतोच किती ? इतर माध्यमांचाही उपयोग केल्यास निदान जगभराच्या विचारवंतानाही ते पाहता येईल. संहितेच्या पानातून ते नाटक वाचण्यापेक्षा निदान प्रयोग पाहता येईल. हा एक पर्याय आहे. आणि माझ्या मते अशा अनेक माध्यमातून जनजागृती करुन अशा नाटकांसाठी आणि अशा रंगकर्मींसाठी सुद्धा निधी निर्माण करता येतो.
स्लार्टीच्या/स्वातीच्या सर्व मुद्यांना अनुमोदन. विनयही बहूधा तेच म्हणायचा प्रयत्न करताहेत. समन्वयी धोरण अवलंबून प्रायोगिक नाटकांनाही वर्णी लावता येईल, नव्हे लावलीच पाहीजे. Visa साठी स्पॉन्सर करायला मंडळाचे खंदे कार्यकर्ते पुढे यावेत.
नीधप - पहिले आणि शेवटचे पोस्ट आवडले. त्यातल्या मुद्यांवर विचार करुन हे थोडेफार सामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीने मांडले आहे.
असो- संस्था (अमेरीकेतली) झाली तरी, हे खायचे काम नाही हे जाता जाता नमुद करावेसे वाटते. त्यामागेही अतोनात कष्ट आहेत/असतात. कुठलीही हटके गोष्ट करावी म्हणलं की विरोध हा होणारच. व्यावसायिक Vs प्रायोगिक ह्याच्या प्रमाणात व्यावसायिक कार्यक्रमाचा भरणा अधिक असणारच. त्यातून मिळालेल्या निधीसह प्रायोगिक कार्यक्रम संस्थेनी करावेतच. ही फारच तारेवरची कसरत आहे, पण त्याला इलाज नाही.
व्यावसायिक कलाकारही खूप कामं पैशासाठी/यश/किर्तीसाठी, एखाचे काम कलेसाठी/बांधिलकीसाठी करतोच. उलटही. त्या निमीत्ताने त्याचा टिपीकल प्रेक्षकवर्गही थोडा मेंदूला ताण द्यायला उद्युक्त होतो. ही परंपरा कित्येक दशकं चालू आहे. तीच बरोबर आहे असं मला म्हणायचं नाही, पण ती अशी सहजासहजी उलथून पडेल यावर माझा विश्वास नाही.
असो. असाच विचार केला असता तर तेंडूलकर/पेठे/आळेकर/देशपांडे/केंद्रे घडले असते का ? तिथे पारितोषीकांनी / परिषदांनी आणि काही अंशी सरकारनेही भुमिका बजावली हे नाकारता येणार नाही. ती पुरेशी आहे का, ह्या मुद्यावर वाद होऊ शकतात. याउलट सर्वच प्रायोगिक नाटकं चांगलीच असतात का? तसंही नक्की म्हणता येणार नाही.
रैना, 'आनंद
रैना,
'आनंदओवरी' हे दि.बा. मोकाशींच्या कादंबरीचं तेंडुलकरांनी केलेलं नाट्यरुपांतर आहे.
<पण मुळात प्रायोगिक नाटकांना प्रेक्षक लाभतोच किती ? इतर माध्यमांचाही उपयोग केल्यास निदान जगभराच्या विचारवंतानाही ते पाहता येईल. >
हा तुझा मुद्दा पटला नाही. गेल्या काही वर्षांत मी काही अतिशय दर्जेदार प्रायोगिक नाटकं बघितली आहेत. आणि निदान पुण्यात तरी सुदर्शन रंगमंचाच्या बाहेर कायमच लांब रांगा लागलेल्या असतात. मी स्वतः काही वेळा तिकीट न मिळाल्याने परत आलो आहे.
विविध प्रवाहांतील नाटकं, परिसंवाद वगैरे वगैरे हे अमेरिकेत घडू शकणार आहे का? निदान वर जे इंग्रजीत लिहिलं आहे, त्यात तरी असा काही उल्लेख नाही. 'To quench this inherent urge, we promise to bring you
the Best Marathi Plays from the world,
which will fully satisfy the taste of the US audience.
'' .. म्हणजे हे केवळ नाट्यप्रयोग आहेत, ज्याचा नीरजाने पूर्वीच उल्लेख केला आहे.
भारतातही नाट्यसंमेलनांत वाद, भांडणं होतातच, मिथुन, अमिताभ उद्घाटनाला येतात म्हणून टीकाही होते, मोठे कलावंत संमेलनात फिरकत नाहीत, त्या दिवशी मुंबई-पुण्यात नाट्यप्रयोग ठेवले जातात, पण तरीही काही प्रमाणात का होईना नाट्यसंमेलनाचा उद्देश सफल होतच असणार. नाट्यसंमेलन म्हणजे Best Marathi Playsचे प्रयोग हे मलातरी इतक्यातच कळलं.
चिनुक्सा-ध
चिनुक्सा-धन्यवाद. मोकाशींची कादंबरी. सॉरी.
आनंदओवरीला पेठ्यांचे दिग्दर्शन आहे ना ?
पृथ्वी आणि एन.सी.पी.ए ही ब-याचदा हाऊसफुल्ल असतात,नाही असं नाही. पण तुलनेने त्यांचे होणारे प्रयोग पाहता, आणि बहुतांश प्रेक्षकांपर्यंत पोचेपर्यंत ते बंद पडतात. असो.
नाट्यसंमेलन म्हणजे Best Marathi Playsचे प्रयोग हे मलातरी इतक्यातच कळलं
काही प्रमाणात संमेलनाचा उद्देश तिथेही सफल होऊ शकेल असं मला वाटतं आणि अशा प्रकारच्या लॉबिंग मुळे दबाव आणूनही उपयोग होऊ शकेल.
काही प्रायोगिक कलाकारांची निवड/ शिष्यवृती / अमेरिकन थियेटरशी वैचारीक देवाणघेवाण हे सर्व राबवल्या जाऊ शकते.
आता "त्या"ही कलाकारांच्या निवडीत राजकारण होणारच नाही असे आपण खात्रीलायक म्हणू शकु का? त्यातही आरोप/प्रत्यारोप होणारच.
काही
काही प्रायोगिक कलाकारांची निवड/ शिष्यवृती /<<
हे चालूच असतं. मी पण असिस्टंटशिपवर अशी डिग्री मिळवलेली आहे. इतर अनेक जण आहेत हे करणारे. पण त्यात मराठी कम्युनिटीचा काहीच संबंध नसतो.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
त्यात
त्यात मराठी कम्युनिटीचा काहीच संबंध नसतो?>>> अगदी. पण असू शकेल ? असावा ? डॉ नेरुरकर जर अध्यक्षा आहेत तर परिषदेच्या निमीत्तानी त्यांनी त्यांचे अहवाल, कार्यक्रमाची रुपरेषा, आगामी उपक्रम वगैरे देणे अपेक्षीत आहे. दबाव गटांचीही नैतिक जबाबदारी आहे. एका मराठी माणसानी ते करण्यापेक्षा परिषदेला करणे सोपे जावे असं मला वाटतं.
अशा प्रकारच्या परदेशातील उपक्रमाला काय लागत असावे ?
-मनुष्यबळ
-भरघोस आर्थिक जवाबदारी घेण्याची कुवत
-स्थानिक राजकारणात वट/ हितसंबंध/ दबावगट/ कायदेतज्ञ ?
-आणि काही दूर्दैवी घटना घडल्याच तर त्याची जवाबदारी घेऊ शकणारी संकट व्यवस्थापन व्यवस्था
त्यामुळे वेगळ्या वातावरणातील आणि व्यावसायिक रित्या यशस्वी लोकांचा/ त्यांच्या कुटुंबियांचा भरणा समित्यात असतो. त्या टार्गेट पॉप्युलेशनला पिच करुन / दबाव आणुन अगदीच काही होऊ शकणार नाही का?
तत्व आणि
तत्व आणि Practicality ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत....
काही लोकांकडे खूप चांगले विचार असतात.. पण विचार चांगले म्हणून ते घडवता येतील असे होत नाही.
मराठी नाटक ही मुळात बुडती नौका वाटते. व्यावसायिक नाटकांमधे गेल्या १० वर्षात बघाल तर २ ते ३ टक्के नाटकं पण चाललेली नाहीत (हा आकडा चुकीचा असेल पण तो २५% पर्यंत जाणार नाही..)
मग इतरांचं काय?
चर्चा, परीसंवाद इत्यादी घडावेतच... पण मला एक सांगा 'नांदेड' ला नाट्यसम्मेलन झाल्यामुळे नांदेडचे ५०,००० नवीन प्रेक्षक प्रायोगिक नाटकाना येऊ लागले. प्रायोगिक सोडाच व्यावसायिक नाटकाना नांदेडमधे प्रचंड प्रतिसाद असं वाचलंय तुम्ही कुठे... (काही वर्षांपूर्वी नांदेडला सम्मेलन झाले होते). तेव्हा ती चर्चा किती मर्यादित आहे हे लक्षात यावे.
व्यावसायिक नाटकवाले म्हणून इथे येत आहेत. त्याना त्यांच्या पोटाची काळजी पडलीय... शेवटी नाटकाचा धंदा हा प्रेक्षकावर अवलंबून आहे. त्याला जे हवे ते देण्याचा प्रयत्न आहे हा.... त्याला 'नाटकाचा फड' म्हणायला काहीही हरकत नाही.
अनुदान वगैरे कुणी मागत नाही हो भारतातून. एकाद्या राजकारण्याने घोषणा केलीच तरी ते पैसे परत देतात (हे मी वर सांगितलेच आहे).. आणि राजकारणी लोक बोलतात तसे वागतात असं कुणाला वाटत असेल तर मग काय हवं...
'नाट्यसम्मेलन' अमेरिकेत करणे शक्य नाही हे मी पण मान्य करतोय पण तो विरोध तुम्ही भारतात दाखवून खरे नाट्यसम्मेलन तिकडे करायला(च) हवे.. त्याचा राग अमेरिकेवर कढून काय फायदा? (जे आम्हाला नेहमी मिळत नाही ते मिळणार याचा आम्हाला आनंद आहे. )
म्हणून 'तुमचा राग अस्थानी आहे' असं मी अजूनही म्हणतो.
बाकी झक्कींप्रमाणे 'फालतू कलाकार' वगैरे भाषा 'निधापा' यानीच वापरली तेव्हा मी हमरीतुमरीवर येतो हे सगळ्यानाच मान्य व्हावं.
विनय
४(की ८की
४(की ८की १०?) व्यवसायिक नाटकांच्या प्रयोगांना नाट्य परिषदच नाट्य संमेलन म्हणत असेल तर त्याला अमेरिकेतला मराठी प्रेक्षक काय करणार? आणी त्याला नाट्य संमेलन म्हणायला कोणाचा विरोध असेल तर त्यात ह्या प्रेक्षकाला राग यायचं काहीच कारण नाही (आलेला नाहीये).
इथला मराठी प्रेक्षक हा आजुन तरी नुसता प्रेक्षकच आहे. फावल्या वेळात आणी काढलेल्या तिकीटात जास्तीत जास्त मनोरंजन होइल हे बघणारा आहे. इथे तयार झालेल्या संस्था सुद्धा अश्याच प्रेक्षकांमध्ये ज्यांना जास्त वेळ आहे आणी साहित्य, नाटकं या मध्ये रस असुन त्यांचा वेळ ह्या कामांमध्ये द्यायची तयारी आहे अश्या लोकांपासुनच तयार झाल्या आहेत. थोडक्यात इथे होणार्या नाटकांचे प्रयोगांच्या मागचा हेतु फक्त मनोरंजन असुन दर्जेदार प्रायोगिक नाटकांना संधी देणे हा नाहीये. बाकी नाटकांबरोबर १-२ प्रायोगिक नाटकं जर सादर झाली तर हा प्रेक्षक आवडीनी बघेल पण प्रायोगिक नाटकांना संधी देण्याकरता पोटतिडकीनी लढणारा पिंड तर ह्या प्रेक्षकाचा (आणी संस्थांचा) आजिबातच नाही.
काल पासुन हा बाफं वाचतोय. बाकी वाद एक मिनीट बाजुला ठेवला तर ज्ञानात खुपच भर पडली. आता वादाचा मुद्दा. खरं तर सुरवातीला मुद्द्यांमध्ये काही फारसा फरक नव्हता. झक्कींची एक पोस्ट आली आणी झालं सुरु.
मंडळी, झक्की जेव्हा लिहीतात तेव्हा ते वाद प्रतिवादा पेक्षा झक्कीवाद करत असतात हे आपण सर्वच जाणतो. त्यांच्या पोस्टींना दिलेलं उत्तर हे "झक्कींना दिलेलं उत्तर" या सदराखालीच यावं. त्या उत्तरात वादी किंवा प्रतिवादींनी मुद्दे शोधु नये. त्यात मुद्दे नसतात असं नाही पण मांडणी स्फोटक असते.
आधीच्या पोस्टी तपासल्या तर कळेल की प्रेक्षकाला किंवा अमेरिकेला दोष दिला गेला नव्हता हे सगळ त्यांच्या पोस्टीच्या उत्तरादाखल लिहीलं गेलं होतं.
माझे येथील
माझे येथील कार्य झाले (जनजागृतीचे). दुसरा काही विषय निघाला की लोकांचे लक्ष वेधायल मी परत हजर होईन. मी जे जहाल, असभ्य शब्द वापरतो, त्याबद्दल क्षमा. पण कुत्र्याचे शेपूट, कडू कारले इ. गोष्टी तुम्हाला माहित असतीलच. फक्त त्या वैयक्तिक नाहीत हे मी शपथेवर सांगू इच्छितो.
आता ज्यांना कळते नि कऴकळ आहे अश्या लोकांनी अत्यंत सभ्य, सोज्ज्वळ व मृदु भाषेत चर्चा करायला हरकत नाही. मी काही आता इथे येत नाही.
यातले
यातले जेवढे झेपले तेवढे वाचले नाही झेपले ते कदाचित वाचणारही नाही. माझे काही मुद्दे असे आहेत -
हे संमेलन करणारे जे स्थानिक कार्यकर्ते असतात त्या गटात (समुहात) विरोध करणार्या मंडळींपैकी कोणी काम केले आहे का -भारतात किंवा भारताबाहेर?
भारतातल्या परिषदा 'आम्हाला तुमच्याइथे संमेलन करायचे आहे?' असे परदेशी संस्थांना विचारतात का? की परदेशी संस्था देशातल्या संस्थांना विचारतात?
सुयोगचे २-३ नाटकांचे प्रयोग जसे इकडे होतात तशा इतर कोणात्याच संस्था का करत नाहीत?
सूर्य पाहिलेला माणुस, आनंदओवरीचे प्रयोग आम्हाला इथे पहाणे शक्य झाले नसते म्हणुन त्याचे चित्रीकरण करुन दाखविले गेले. तो देखील एक मोठा आनंदाचा भाग होत. तसे इतर चांगल्या प्रायोगीक नाटकांचे का होत नाही.
चित्रीकरण आणि नाट्यप्रयोग सादर करणे यात अगदी १८० डिग्रीचा फरक आहे, हवी ती अनुभूती मिळात नाही हे जरी मान्य केले तरी ते आमच्यासारख्या लोकाना पहायला आवडतात आणि शक्य होत नाहीत त्याचा विचार कोणीच का करताना दिसत नाही?
ही जी संमेलने होतात त्यातुन उपेक्षा होते ते त्यासाठी झटणार्या शेकडो व्हॉलंटीयर्सची कारण सगळ्यात जास्त घाम त्यांनी वाहीलेला असतो. यातून आपल्याला काय मिळणार हा विचार न करता शेकडो लोक पडद्यामागे राबतात (अगदी राबतातच) त्याची कोणलाही कल्पनादेखील नसते. ते खरोखर तळमळीने करतात घरचे कार्य असल्यासारखे. यसंबंधात झालेल्या राजकारणाचा/चर्चांचा स्वतःच्या मनावर प्रतिकुल परिणाम न होउ देता.
बरेच वाद-दिवाद होतात आणि संमेलनेही होणारी होतातच. पण भारताबाहेर एखादी गोष्ट करायची झाली की या गोष्टी जास्तच होतात. यावर मार्ग/उपाय फक्त भारताबाहेरील लोकानीच काढावा असे नसावे. भारताबाहेर रहाणार्या कोणीही नाट्यपरिषतेतल्या किंवा साहित्य परिषदेमधल्या लोकाना ओळखत नाही असे समजून चालू. तर या सगळ्या गोष्टी नाट्यपरिषदेच्या कानावर कोणीतरी घालायला हव्यात. पण इथे त्या मांडून कितपत उपयोग होईल माहिती नाही. सगळेच तळामळीने लिहितात पण ज्यांना कळले पाहीजे किंवा जे लोक यावर उपाय काढु शकतील असे वाटतेय त्यांच्यासमोत मांडण्याने फायदा जास्त होईल असे मला तरी वाटते.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
Pages